Headlines

आंबा बागायतदार मोर्चाला जामसंडे शहर व्यापारी संघाचा पाठिंबा…

१२ मार्च रोजी जामसंडे बाजारपेठ ठेवणार बंद :जामसंडे शहर व्यापारी संघ अध्यक्ष राजेंद्र पाटील यांची माहिती… ⚡देवगड ता.१०-:जामसंडे शहर व्यापारी संघटनेची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत देवगड तालुक्यातील आंबा शेतकरी व आंबा बागायतदारांच्या १२ मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चाला जामसंडे शहर व्यापारी संघटनेने पाठिंबा जाहीर असून जमसंडे बाजार पेठ बंद ठेवणार असल्याची…

Read Full News

नौकेतून पडल्याने खलाशी समुद्रात बेपत्ता…

⚡मालवण ता.१०-:मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील रुपेश गोपाळ जुवाटकर (रा. गाबीत केळी, ता. अंकोला, कारवार) हा खलाशी नौकेतून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याबाबत नौका मालक ऑलविन फर्नांडिस यांनी मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे. ऑलविन फर्नांडिस यांच्या मालकीच्या मदर मेरी या बल्याव नौकेतून चार जण रविवारी मालवणच्या समुद्रात मासेमारीसाठी गेले होते….

Read Full News

“स्त्रीला ‘माणूस’ म्हणून समान संधी द्या; तिच्या सन्मानातूनच राष्ट्राचा विकास”-: साहित्यिका वृंदा कांबळी…

⚡मालवण ता.१०-: ज्या देशात स्त्रीचा सन्मान होतो, त्या देशाचा विकास होतो. आजही शिक्षण, करिअर, विवाह किंवा वैयक्तिक निर्णय या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीला स्वतःच्या इच्छेपेक्षा समाजाच्या अपेक्षेनुसार जगावं लागतं. तिला सामाजिक बंधनांमध्ये जखडून न ठेवता “माणूस” म्हणून जगण्याची समान संधी दिली पाहिजे. स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर राष्ट्रनिर्मितीची शक्ती आहे. मातृत्व, प्रेम, करुणा त्याग या…

Read Full News

राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत भरतगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी…

⚡मालवण ता.१०-:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत मसुरे देऊळवाडा येथील भरतगड हायस्कूल नंबर २ चे विद्यार्थी कुमारी दुर्वा प्रसाद परब हिने ७८ गुण आणि कुमार स्वराज समीर बागवे ७३ गुण मिळवीत प्राप्त करीत घवघवीत यश प्राप्त केले या त्यांच्या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या…

Read Full News

दांडी परिसरात रस्ते विकासकामांचे भूमिपूजन संपन्न…

⚡मालवण ता.१०-: आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून मंजूर दांडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर व नगरसेवक महेश कोयंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गौरी महादेव मिठबावकर यांनी श्रीफळ फोडून शुभारंभ केला. यावेळी…

Read Full News

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत सौ मधुरा परब पैठणीच्या मानकरी…

⚡मालवण ता.१०-:श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा च्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत आचरा देऊळवाडी येथील सौ. मधुरा महेश परब या विजेत्या ठरल्याने पैठणीच्या मानकरी तर आचरा देऊळवाडी येथील सौ. राधा गोविंद राणे या उपविजेत्या उप विजेत्या सौ. राधा गोविंद राणे या सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या. श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी…

Read Full News

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जनजागृतीसाठी सावंतवाडीत बाईक रॅली…

⚡सावंतवाडी, ता.०९-: जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत अभय केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त बाईक रॅली काढून समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत व संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्रीमती दिपाली भालेकर, तालुका संरक्षण अधिकारी…

Read Full News

महीलांनी आता आत्मविश्वासाने पुढाकार घेणे काळाची गरज…

सौ.मानसी परब :महिलांचा प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचा सहभाग आणि योगदान महत्त्वाचे;आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान .. ⚡सावंतवाडी ता.१०-:आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने सावंतवाडी हिंदुस्तान पॉलिमर उद्योम नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महीलांना सन्मानित करण्यात आले. महिलांच्या जीवनात आणि समाजात तर खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणायचे असेल तर स्वतः महीलांनी…

Read Full News

पी एम श्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेकडून कर्तुत्ववान महिलांचा सन्मान…

⚡वैभववाडी ता.१०-: जागतिक महिला दिनानिमित्त पी एम श्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.यावेळी वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर केंद्रप्रमुख विजय केळकर, रामचंद्र जाधव व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस साळुंखे उपाध्यक्ष सौ दळवी सदस्य तथा पत्रकार संजय शेळके मुख्याध्यापक दिनकर केळकर विद्या गुरखे अविनाश आवटे…

Read Full News

“दोडामार्ग तालुक्यात घोटगेवाडी जि.प. शाळेची चमक; ‘माझी शाळा सुंदर शाळा’त प्रथम”…

⚡दोडामार्ग ता.१॰-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर घोटगेवाडी शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अंतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. दीडशे वर्षपूर्ती कडे वाटचाल करणारी दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद विद्या मंदिर घोटगेवाडी या शाळेने मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त केला. मा. गटविकास अधिकारी मा. गटशिक्षणाधिकारी ,मा. शिक्षण विस्तार अधिकारी मा केंद्रप्रमुख…

Read Full News

You cannot copy content of this page