मनसेच्या पाठपुराव्याला यश; बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची नियुक्ती…

⚡बांदा ता.११-:
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध त्रुटी आणि कर्मचारी कमतरतेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. गेल्या महिन्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत बांदा आरोग्य केंद्रातील अडचणी आणि कर्मचारी कमतरतेबाबत सविस्तर निवेदन दिले होते.
या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारक म्हणून किरण मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली असून सफाई कर्मचारी म्हणून दिनेश शेर्लेकर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसेवेला मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज मनसेच्या वतीने नव्याने नियुक्त झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बांदा हॉस्पिटलमधील सुविधा सुधारण्यासाठी पुढेही पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.
फोटो:-
बांदा आरोग्य केंद्रात नव्याने नियुक्त झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत. सोबत इतर.

You cannot copy content of this page