बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.११-: येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल व LSM फुटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ या प्रशालेमध्ये दि. 2 मे ते 10 मे या कालावधीत संपन्न झालेल्या समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या समर कॅम्पचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, कुडाळ पोलीस उपनिरीक्षक जनार्दन झारापकर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. चैताली बांदेकर, LSM फुटबॉल क्लबचे पदाधिकारी जयंत
चमणकर, अ‍ॅड. सिद्धार्थ कुडाळकर , अ‍ॅड. सौ. प्राजक्ता शिरोडकर, अलोन परदेसी, जलतरण प्रशिक्षक श्री. वराडकर, राज धुमाळ, कॅरम प्रशिक्षक श्री. काळे , क्रीड़ा शिक्षक रोहिदास राणे व त्यांचे सर्व सहकारी शिक्षकवृंद आणि सर्व खेळाडूंचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. झारापकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढ वाढवून या समर कॅम्पची अत्यंत उत्साही वातावरणात सुरुवात झाली. आपल्या दैनंदिन जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांचा लाभ घेऊन तंदुरुस्त व्हा, असा मोलाचा संदेश संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी दिला.
दरम्यान दुसर्‍या दिवशी प्रसिद्ध संमोहन शास्त्राचे अभ्यासक विकास नाईक यांनी शरीर स्वास्थ्य व मनाची एकाग्रता कशी साधावी या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले.
दि. 2 मे ते 9 मे या दरम्यान संपन्न झालेल्या या समर कॅम्प मध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, जलतरण, मैदानीस्पर्धा, कॅरम, बुद्धिबळ या सर्व खेळांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात आले.
विशेष म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आलेल्या जलतरण तलावात मनसोक्त पोहण्याचा आनंद प्रशिक्षक श्री. वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पद्धतीने घेतला. वाढत्या उन्हाळ्याच्या दिवसात जलतरण या क्रीड़ा प्रकाराकडे मुलांचा ओघ वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रशालेच्या आवारात बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये मुलांसाठी जलतरण तलावाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांतर्फे शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गळावाणकर व सहकाऱ्यांना धन्यवाद देत आहेत
अतिशय उत्साही आणि खेळमेळीच्याच्या वातावरणात हा समर कॅम्प यशस्वीपणे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी या समर कॅम्प मध्ये आपल्या विविध कलागुणांना उजाळा देण्याचा प्रयत्न सुद्धा केला.

You cannot copy content of this page