कचरा डेपोला भीषण आग; न.प. प्रशासनाच्या तत्परतेने आग आटोक्यात…

⚡सावंतवाडी ता.११-: शहराच्या सीमेवर असणाऱ्या न.प.च्या कचरा डेपोला आज दुपारच्या वेळी आग लागली. यामुळे परिसरात धुराचे लोट वाहू लागले होते. न.प. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.

येथील कचरा डेपोत सुका कचरा ठेवला जातो. आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट वाहू लागले. आगीन उग्र रूप धारण केल्यानंतर न.प.चे अधिकारी, कर्मचारी अग्निशमन दलासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, अक्षय पंडीत, शेखर मेहत्तर, अग्नीशमन नंदू गावकर व कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page