माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘माणिक मोती’ संगीत मैफिल १६ मे रोजी…

⚡सावंतवाडी ता.११-: विदुषी पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता निमित्ताने ”माणिक मोती” या विशेष संगीत मैफिलीच आयोजन स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. शनिवार १६ मे २०२६ रोजी सायं. ५.३० वा. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांची उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित राहणार आहेत. तर सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक प्रदीप शेवडे, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, अध्यक्ष शैलेश पई, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गांवकर, शि.प्र. मंडळ, सावंतवाडी उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. माणिक वर्मा यांनी गायलेल्या अजरामर केलेल्या गीतांचा सदाबहार नजराणा या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे. गायिका मंजिरी धोपेश्वरकर, नूतन परब, वर्षा देवण, सिद्धी परब, समृद्धी सावंत, केतकी सावंत, विधीता केंकरे, मानसी भोसले, पूर्वा धाकोरकर, श्रृती सावंत, सानिका गावडे, ऋचा पिळणकर, सानिका सासोलकर आदी गीतांच सादरीकरण करणार असून साथसंगत निलेश मेस्त्री, किशोर सावंत, सिद्धेश सावंत, संकेत म्हापणकर, साहिल घुबे, समर्थ केळुसकर, मंगेश मेस्त्री, निरज भोसले, मनिष पवार करणार आहेत‌. ध्वनी संयोजन स्मितेश पंडीत तर मैफिलीचे सूत्रसंचालन संजय कात्रे करणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे निरज भोसले व विनायक गांवस यांनी केले आहे.

You cannot copy content of this page