Headlines

प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान…

कुडाळ मध्ये पुरस्कार वितरण सोहळा:ज्येष्ठ अभिनेता प्रसाद पंडित यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.. कुडाळ : प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत असताना मराठी भाषा संवर्धनाची सुद्धा…

Read Full News

आकेरीचा तेजस खटावकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

चालत फिरण्याच्या अनोख्या शैलीमुळे जिल्ह्यात ओळख: अनेक बड्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे नाते.. सावंतवाडी:​जिल्हाभर आपल्या अनोख्या शैलीत चालत फिरणारे आणि पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक बड्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे आकेरी येथील तेजस खटावकर यांचे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने आकेरी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.​तेजस…

Read Full News

कणकवली बसस्थानकामध्ये स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.११-: एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असणार आहे. मंगळवारी कणकवली बसस्थानकामध्ये या स्मार्ट कार्ड काढण्याच्या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. एसटीच्या कारभारात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सवलतींची अचूक नोंद ठेवण्यासाठी महामंडळाने ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बैंक…

Read Full News

दांडी येथे जाळ्यात अडकलेल्या घारीला जीवदान…

⚡मालवण ता.११-:दांडी येथील दांडेश्वर मंदीर नजीक जाळ्यात अडकलेल्या व उष्णतेमुळे निर्जलीकरण झालेल्या घार (ब्लॅक काईट) पक्षास मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांनी जीवदान दिले. दांडी येथील दांडेश्वर मंदिरनजीकच्या समुद्र किनाऱ्यालगत जाळ्यात अडकलेला व उष्णतेमुळे निर्जलीकरण अवस्थेत घार हा पक्षी प्रविण कुबल यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पारंपरिक मच्छिमार, पर्यटन व्यवसायीक प्रविण कुबल, रामा धुरत व वरद मोरजकर यांनी…

Read Full News

ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी कडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 51 हजार 500 रुपयाची देणगी…

⚡सावंतवाडी ता.११-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून रुग्णांच्या सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी अण्णा देसाई प्राध्यापक सुभाष गोवेकर व संस्थेचे सचिव प्रकाश राऊळ यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्याकडून रोख रक्कम 51 हजार 500 रुपये एवढी देणगी देण्यात आली.सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जिल्हास्तरावर करत असलेले सेवाभावी कार्य अतिशय उत्कृष्ट आहे याचा अनुभव आम्ही नेहमी…

Read Full News

देवगड सागरी हद्दीत कर्नाटकच्या ट्रॉलिंग नौकेवर धडक कारवाई नौका जप्त…

आठ खलाशी ताब्यात, जप्त मासळीचा लिलाव सुरू.. देवगड / प्रतिनिधी :महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई करत कर्नाटक राज्यातील एका ट्रॉलिंग नौकेला जप्त केले आहे. या कारवाईत नौकेवरील तांडेलसह आठ खलाशांना ताब्यात घेण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या मासळीचा लिलाव सुरू करण्यात आला आहे.मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने…

Read Full News

आंबा बागायतदारांच्या आक्रोश मोर्चाला मराठा समाज देवगडचा जाहीर पाठिंबा. .

⚡देवगड ता.११-:हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव, बाजारातील शेतमालाच्या दरातील घसरण व अनिश्चितता तसेच वाढलेला उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. या समस्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाला मराठा समाज, देवगड यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.याबाबत देवगड तालुका…

Read Full News

मालवणात १४ रोजी शहादत कार्यक्रम…

गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० शहिदी शताब्दी वर्षानिमित्त आयोजन.. ⚡मालवण ता.११-:श्री गुरु तेग बहादूर सिंग यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने युथ फॉर भारत मालवण तर्फे दि.१४ मार्च रोजी सायंकाळी ४. ३० वा. दैवज्ञ भवन, मालवण येथे ‘शहादत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत देशाच्या हिंदभूमीवर, स्वातंत्र्याच्या स्थन्डीलावर…

Read Full News

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा…

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरव.. ⚡​सावंतवाडी ता.११-:राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य, जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘नारीशक्ती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.​या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक माधुरी अनिल…

Read Full News

पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा बोध घ्यायला लावणारा उपक्रम…

जिल्हाधिकारी धोडमिसे:मुख्यालय पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धेला दमदार सुरुवात.. ओरोस ता ११सुखर जीवनासाठी निरोगी आयुष्य महत्वाचे असते. निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा असतो. हा व्यायाम मैदानावरील खेळातून मिळते. त्यामुळे नियमित खेळणे महत्वाचे आहे. त्याच उद्देशाने मुख्यालय पत्रकार संघाने आयोजित केलेल्या जिल्ह्यातील पत्रकारांसाठीच्या क्रिकेट स्पर्धा हा उपक्रम निश्चितच बोध घ्यायला लावणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

Read Full News

You cannot copy content of this page