घोडेमुख येथे रस्त्यावर भली मोठी झाडाची फांदी कोसळल्याने वाहनांस होतोय अडथळा…

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी ते मळेवाड मुख्य रस्त्यावर घोडेमुख ग्रामपंचायत शेजारील रस्त्यावर झाडाची भली मोठी फांदी तुटून गेले दोन दिवस रस्त्यावर धोकादायक स्थितीत असल्याने वाहनचालकात अडथळा निर्माण झाला आहे.रात्री च्या वेळी तर ह्या रस्त्यावरून प्रवास करताना एखादा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तरी या रस्त्यावर एखादी दुर्घटना घडण्याआधी संबंधित विभागाने सदरील रस्त्यावर आलेली झाडाची फांदी लवकरात लवकर हटवण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.

You cannot copy content of this page