मालवण बाजारपेठेतील ‘दिलखुश’ सलूनला भीषण आग…

४ लाखांचे नुकसान:, अज्ञात व्यक्तीकडून आग लावली गेल्याचं व्यक्त केला संशय…

⚡मालवण ता.१२-: मालवण बाजारपेठ येथील निलेश चव्हाण यांच्या मालकीच्या दिलखुश हेअर कटिंग सलून हे दुकान अगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना घडली असून या आगीत श्री. चव्हाण यांचे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी ज्वालाग्रही पदार्थ पडल्याचे आढळून आल्याने ही आग अज्ञात व्यक्तीकडून लावली गेल्याचा संशय निलेश चव्हाण यांनी पोलिसांजवळ व्यक्त केला आहे.

या संबधीचे अधिक वृत्त असे की मालवण बाजारपेठ येथे निलेश चव्हाण यांचे दिलखुश हेअर कटिंग सलून नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास या दुकानाला आग लागली. ही आग स्थानिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्याची माहिती चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी तातडीने धाव घेत स्थानिक नागरिकांसह आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका मोठा असल्याने संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेमुळे चव्हाण कुटुंब यांना मोठा धक्का बसला आहे. रात्री उशिरा आग लागण्याची घटना समजतात नगरपालिकेच्या बुलेट अग्निशामक बंब गाडीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आग आटोक्यात आली नाही, याबाबत मालवण पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page