अनधिकृत भाजी विक्रेत्यांवरील कारवाई नियमांनुसारच..

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची स्पष्ट भूमिका:“मच्छी मार्केट भाजी विक्रीसाठी योग्य नाही”; नवीन भाजी मंडई पूर्ण झाल्यानंतर पर्यायी जागा देण्याचे आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.१२-: स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या सुचनेनुसारच तेथील अनधिकृत भाजी विक्रेत्यांना‌ उठवण्यात आलं. तसेच इतरांवरही कारवाई केली. नियम सर्वांना सारखा असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. , याबाबत नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

त्या म्हणाल्या मच्छी मार्केट ही जागा भाजी विक्रीसाठी चांगली नसून विक्रेत्यांना दुसरी जागा दिली जाईल, भाजी मंडईचे काम पूर्ण झाल्यानंतर तिथे जागा देऊ असंही आश्वासन त्यांनी दिले. तर, शिवसेना नगरसेवकांकडून इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी दिलेल्या आव्हानाबाबत विचारल असता, सुरूवात एका ठिकाणाहून होते. नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या सुचनेनुसारच अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली. मात्र, नियम सर्वांना सारखा असल्याने इतरांवरही कारवाई करण्यात आली. भाजी मंडईचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांना तिथे चांगली जागा उपलब्ध करून देण्यात येईल, मच्छी मार्केट ही जागा भाजी विक्रीसाठी योग्य नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page