Headlines

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २५ रुग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी तालुक्यात आज २५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १४ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

पूरग्रस्त प्रती कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,5 किलो तूरडाळ, 5 लिटर केरोसीन मोफत

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि२७-:* अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार झालेल्या प्रती कुटुंबांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 किलो तूरडाळ आणि 5 लिटर केरोसीन मोफत देण्याची सूचना तहसिलदारांना दिली आहे. बाधित कुटुंबांकडून मागणी झाल्यास तांदळाचे प्रमाण वाढवून एकूण 20 किलो अन्नधान्य देण्यात येईल. सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथे एनडीआरएफचे एक पथक कोसळलेल्या दरडीत…

Read More

आडवली मालडी जि. प. मतदारसंघात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न

*💫मालवण दि.२७-:* आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातआमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. शिवसंपर्क अभियानांतर्गत हिवाळे व रामगड येथे बैठक घेऊन कार्यकर्त्यांना संघटना वाढी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आडवली मालडी विभाग प्रमुख पदी बंडू चव्हाण यांची निवड करण्यात आली. तर विभाग संघटक पदी संतोष घाडी, व रामगड शाखा प्रमुख पदी रामू सादये…

Read More

चिपळूण पूरग्रस्तांना वेंगुर्लेतील विविध संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूची मदत

*💫वेंगुर्ले दि.२७-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांनी पुढाकार घेवून इतर संस्था नागरीकांना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ला नगरपरिषद नगरसेवक, वेंगुर्ला नगरपरिषद कर्मचारी, We For You सामाजिक संस्था व वेंगुर्ला येथील दानशूर व्यक्ती यांनी एकत्र येत १ हजार रुपये साहित्याची एक बॅग याप्रमाणे १०० फुड बॅग चिपळूण…

Read More

कोकणात पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मदतीचा हात

सिंधूदूर्ग जिल्ह्यात मदत कार्याची अमित सामंत यांच्याकडे जबाबदारी *💫कणकवली दि२७-:* महाराष्टासह कोकणपट्टीतील सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरस्थिती मुळे अनेक घरे,व्यावसायिक.छोटे मोठे दुकानदार यांच्या इमारती यामध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूसह अन्नधान्य.कपडे भांडी यासह कौटुंबिक आवश्यक साहित्यासह सर्व व्यापारी वर्गासह सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच घरांचीही पडझड होऊन काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अशावेळी आपदग्रस्त कुटुंबांना…

Read More

चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एडगावचे श्री रामेश्वर क्रीडा मंडळ व ग्रामस्थ धावले

जीवनावश्यक वस्तूंचे १०० किट सुपुर्त *💫वैभववाडी दि२७-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांना तालुक्यातील एडगावच्या श्री रामेश्वर कला व क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे १०० किट सुपुर्त करण्यात आले. चिपळूण येथील रा.स्व.संघ यांच्या मदतसेवा केंद्रामध्ये देण्यात येणार आहेत आज सकाळी जीवनावश्यक वस्तूं घैऊन मंडळाचे कार्यकर्ते चिपळूण येथे जाण्यासाठी वैभववाडी येथून रवाना झाले आहेत. गावतून तांदुळ,गहू,कांदे,बटाटे,कपडे इत्यादीं…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील रुग्णालयांना 5 ऑक्सिजन काँन्सेन्टेटर प्रदान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य *💫सावंतवाडी दि.२७-:* शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील रुग्णालयांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर 5 ऑक्सिजन काँन्सेन्टेटर प्रदान करण्यात आले राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या संयुक्त विद्यमाने हे ऑक्सीजन काँन्सेन्टेटर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमधील चार…

Read More

कुडाळ मालवण विधानसभा युवक काँग्रेसच्या माध्यमातून चिपळूण पूरग्रस्तांना मदत

*💫मालवण दि २७-:* रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मध्ये पूर येऊन अनेक घरे, बंगले, इमारतीचे मजले या पाण्याखाली गेल्याने घराघरातील जीवनावश्यक वस्तू खराब झाल्याने तेथील नागरिकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन कुडाळ मालवण विधानसभा युवक काँग्रेसच्या माध्यमातून चिपळूण पूरग्रस्तांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून या संकट काळात दिलासा देण्यात आला. चिपळूण पूरग्रस्त भागातील…

Read More

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत भरतगड इंग्लिश मीडियमचे यश

*💫मालवण दि.२७-:* ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. निकाल पुढीलप्रमाणे – वरद सतीश वाळके (सातवी) – ८९ गुण (सुवर्णपदक), विक्रम अनिरुद्ध | मेहेंदळे (आठवी) -८८ गुण (सुवर्णपदक). त्याचप्रमाणे रणवीर संग्राम प्रभुगावकर, श्रावणी राजेश गावकर (तिसरी), गोजिरी चंद्रकांत मेस्त्री (चौथी) ऋतुजा अविनाश नरे (नववीं) यांनी यश प्राप्त केले…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऐवजी ९ ऑगस्टला

शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती कोरोना प्रादुर्भावमुळे २०२०-२१ च्या अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या पूर्व व उच्च प्राथमिक माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी होणार होत्या. मात्र, आता ही परीक्षा ९ ऑगस्ट रोजी होणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी दिली. तसेच विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सबंधित शाळांच्या लॉगिंगला २७ जुलै रोजी उपलब्ध करून देण्यात आले…

Read More
You cannot copy content of this page