कुडाळ मालवण विधानसभा युवक काँग्रेसच्या माध्यमातून चिपळूण पूरग्रस्तांना मदत

*💫मालवण दि २७-:* रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मध्ये पूर येऊन अनेक घरे, बंगले, इमारतीचे मजले या पाण्याखाली गेल्याने घराघरातील जीवनावश्यक वस्तू खराब झाल्याने तेथील नागरिकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन कुडाळ मालवण विधानसभा युवक काँग्रेसच्या माध्यमातून चिपळूण पूरग्रस्तांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून या संकट काळात दिलासा देण्यात आला. चिपळूण पूरग्रस्त भागातील नागरिक हतबल झालेले असून पिण्याच्या पाण्याची धान्य सामानाची अत्यंत तातडीची गरज असल्याने कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू गोळा करत ही मदत चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्त बांधवांना सुपूर्द केली. १०५ धान्य किट (तांदूळ, गहू पीठ, ज्वारी, साखर, चहा पावडर, कांदे बटाटे, पोहे, रवा, बिस्किट, टूथपेस्ट, ब्रश, साबण), १०० पाणी बॉक्स, तसेच फरसाण व इतर गृहोपयोगी वस्तू, कपडे आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. चिपळूण मधील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चिपळूण मधील आझाद नगर, समता नगर, खेड पिंपळ, भेंडी नाका, फरशी पेढे येथील काही भागात घरोघरी – इमारतीं जवळ जाऊन मदत पोहचवली. यावेळी युवक जिल्हा प्रवक्ता अरविंद मोंडकर, देवानंद लुडबे, चिपळूण विधानसभा युवक अध्यक्ष महेश कदम, कुडाळ विधानसभा अध्यक्ष-मंदार शिरसाट, उपाध्यक्षा पल्लवी विजय तारी, मालवण तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, कुडाळ शहरअध्यक्ष चिन्मय बांदेकर, मालवण शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, सरदार ताजर, ऍड. अमृता अरविंद मोंडकर, योगेश्वर कुर्ले, साजिद सर्गरोह, व रत्नागिरी मधील युवक काँग्रेसचे अविनाश मोहिते, गणेश कणेरी व इतर पदाधिकारी यांनी या मदत कार्यात सहभागी घेतला.

You cannot copy content of this page