मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
*💫सावंतवाडी दि.२७-:* शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील रुग्णालयांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर 5 ऑक्सिजन काँन्सेन्टेटर प्रदान करण्यात आले राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या संयुक्त विद्यमाने हे ऑक्सीजन काँन्सेन्टेटर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमधील चार रुग्णालयांना वाढदिवसानिमित्त प्रदान करण्यात आले. दरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दोन ऑक्सिजन काँन्सेन्टेटर वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी डॉ मुरलीधर हेही उपस्थित होते सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या हस्ते दोन ऑक्सीजन काँन्सेन्टेटर देण्यात आले यावेळी शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुख आणि नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार युवा सेनेचे योगेश नाईक आबा सावंत विशाल बांदेकर पप्पू नाईक गजानन नाटेकर गजा सावंत आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयाला एक शिरोडा ग्रामीण रुग्णालयाला एक आणि वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयाला एक व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दोन असे एकूण पाच ऑक्सिजन काँन्सेन्टेटर आज वाढदिवसानिमित्त रुग्णालयाला देण्यात आले यापूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला चार ऑक्सिजन काँन्सेन्टेटर देण्यात आले असल्याने शिवसेनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला सहा ऑक्सिजन काँन्सेन्टेटर देण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख राऊळ यांनी दिली. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात पूरस्थिती असल्यामुळे आपला वाढदिवस साजरा करू नये असा आदेश पक्षाला दिला होता त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच फ्लेक्स आणि बॅनर्स ही लावण्यात आले नव्हते तर मुंबई-गोवा झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गाच्या दुभाजकावर फूल झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे राऊळ यांनी सांगितले
