चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एडगावचे श्री रामेश्वर क्रीडा मंडळ व ग्रामस्थ धावले

जीवनावश्यक वस्तूंचे १०० किट सुपुर्त

*💫वैभववाडी दि२७-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांना तालुक्यातील एडगावच्या श्री रामेश्वर कला व क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे १०० किट सुपुर्त करण्यात आले. चिपळूण येथील रा.स्व.संघ यांच्या मदतसेवा केंद्रामध्ये देण्यात येणार आहेत आज सकाळी जीवनावश्यक वस्तूं घैऊन मंडळाचे कार्यकर्ते चिपळूण येथे जाण्यासाठी वैभववाडी येथून रवाना झाले आहेत. गावतून तांदुळ,गहू,कांदे,बटाटे,कपडे इत्यादीं आवश्यक वस्तू भरून १०० पाकिट तयार करण्यात आली आहेत या सेवाकार्यात गावातील श्रीधर घाडी , राजु पवार, प्रमोद पवार, सचिन रावराणे, संभाजी रावराणे, निलेश रावराणे, निलेश गुरव, प्रकाश साखरपेकर, विश्वास रावराणे, गावातील जेष्ठ नागरिक, महिला तसेच तरुण मंडळी यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page