सिंधूदूर्ग जिल्ह्यात मदत कार्याची अमित सामंत यांच्याकडे जबाबदारी
*💫कणकवली दि२७-:* महाराष्टासह कोकणपट्टीतील सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरस्थिती मुळे अनेक घरे,व्यावसायिक.छोटे मोठे दुकानदार यांच्या इमारती यामध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूसह अन्नधान्य.कपडे भांडी यासह कौटुंबिक आवश्यक साहित्यासह सर्व व्यापारी वर्गासह सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच घरांचीही पडझड होऊन काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अशावेळी आपदग्रस्त कुटुंबांना काहीसा आधार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय घेतला असून तशाप्रकारे आत्ताच मुंबई प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार यांनी पञकार परिषदेचे आयोजन करून मदतीची रूपरेषा जाहीर केली.त्यानुसार कोकण विभागातील सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील पुरस्थिती हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडे देऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडावी कोणीही पूरग्रस्त राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या मदती पासून वंचित राहाणार नाही याची खबरदारी घेतली जावी.आपण आपल्या टिमसह सर्वानी मिळून पूरग्रस्तांना सहकार्य करण्याचे नियोजन करा.आणी बाधीत कुटुंबांना संकटातून बाहेर काढून दिलासा देण्याचे काम करा असे सांगितले.
