*💫वेंगुर्ले दि.२७-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांनी पुढाकार घेवून इतर संस्था नागरीकांना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ला नगरपरिषद नगरसेवक, वेंगुर्ला नगरपरिषद कर्मचारी, We For You सामाजिक संस्था व वेंगुर्ला येथील दानशूर व्यक्ती यांनी एकत्र येत १ हजार रुपये साहित्याची एक बॅग याप्रमाणे १०० फुड बॅग चिपळूण येथील पूरग्रस्त नागरिकांना पाठविण्यात आल्या. या फुड बॅगमध्ये ५ किलो तांदूळ, १ किलो तूरदाळ, अर्धा किलो चवळी, अर्धा किलो वाटाणे, २ किलो पीठ, १ लीटर गोडेतेल, १ किलो साखर, पाव किलो चहा पावडर, मीठ पिशवी, आंघोळीचे साबण २ नग, कपडे धुण्याचे साबण २ नग, टुथपेस्ट त्याचबरोबर गरजू व्यक्तींना बेडशीट, चादर, सतरंज्या व इतर अत्यावश्यक कपडे इ. साहित्य या फुडबॅगमध्ये समाविष्ट आहे. यापैकी वेंगुर्ला नगरपरिषद नगरसेवक यांनी ४० बॅग, वेंगुर्ला नगरपरिषद कर्मचारी यांनी १८ बॅग व उर्वरित सर्व बॅग रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन, We For You सामाजिक संस्था व वेंगुर्ला येथील दानशूर व्यक्ती यांनी मदतनिधी म्हूणन सुपुर्द केल्या. या सर्व फुड बॅग व इतर अत्यावश्यक जीवनपयोगी साहित्य चिपळून रोटरी क्लबच्या सहकार्याने योग्य आवश्यक पूरग्रस्त नागरिकांना सुपुर्द करण्यात येणार आहे.
चिपळूण पूरग्रस्तांना वेंगुर्लेतील विविध संस्थांकडून जीवनावश्यक वस्तूची मदत
