Headlines

बांद्यात पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांचे स्वागत…

⚡बांदा ता.१५-: सावंतवाडी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सुस्मिता जाधव यांनी नुकतीच बांदा येथे भेट दिली. यावेळी शिंदे शिवसेनेचे युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनीही त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली.या भेटीदरम्यान परिसरातील विकासकामे, नागरिकांच्या अडचणी तसेच आगामी योजनांबाबतही उपस्थितांशी संवाद साधण्यात आला. बांदा परिसराच्या…

Read Full News

पळसंब जी प शाळा येथे अत्याधुनिक प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा संपन्न…

⚡मालवण ता.१५-:आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि याच एकमेव उद्देशाने येथील प्रवेशद्वाराच्या निर्मितीसाठी आपण खारीचा वाटा उचलला. पळसंब शाळेचे हे प्रवेशद्वार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आज आदर्श असे ठरले असून यासाठी सर्वानीचे प्रयत्न केलेत ते प्रयत्न कौतुकास्पद असून भविष्यातही याप्रशालेसाठी आणि या गावासाठी जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक…

Read Full News

शिरोडा ते आजगाव खाजणादेवी मार्ग रस्ता काँक्रीटीकरण चे भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.१५-: आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या सुमारे दहा लाख रुपयांचे शिरोडा जाधववाडी ते आजगाव जाधववाडी खाजणादेवी मार्गाचे रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी येथील ग्रामस्थांनी आमदार केसरकर व उपस्थित लोकप्रतिनिधींचे आभार मानून समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमावेळी पंचायत समिती सदस्य नेहा कांबळी,सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच…

Read Full News

सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश…

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेतील इयत्ता सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष -२०२५-२६ या कालावधीत झालेल्या सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण पदक, तीन रौप्य पदक व चार कास्य पदक मिळून नऊ पदकांची कमाई केली…

Read Full News

तातडीने नेटवर्क सुरळीत करा…

..अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला टाळे ठोकू;बुराव धुरी यांचा इशारा.. ⚡दोडामार्ग ता.१५-: जर तातडीने नेटवर्क सुरळीत झाले नाही तर ‘बीएसएनएल’ जिल्हा प्रबंधक यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांना ग्राहकांची पर्वा नाही त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी ही धमकी समजावी किंवा इशारा पण नेटवर्क सुरळीत करावे असेही श्री. धुरी यांनी माध्यमाना…

Read Full News

वागदेत भरधाव कारची रिक्षा टेम्पोला धडक; चालक जखमी…

⚡कणकवली ता.१५-: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रेसो कारने रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने वागदे टेंबवाडी येथे अपघात घडला. हा अपघात रविवारी (१५ मार्च) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास झाला. भंगार व्यावसायिक कुमार सूर्यवंशी हे आपल्या ताब्यातील रिक्षा टेम्पो घेऊन कणकवलीहून कसालच्या दिशेने जात होते. त्यावेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या GA-03 Z-9608 क्रमांकाच्या…

Read Full News

वेंगुर्ला पंचायत समिती सभापती – उपसभापती –सदस्य यांचा प्रशासनातर्फे सत्कार….

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य – अधिकारी – कर्मचारी यांची समन्वय बैठक व आढावा सभा पंचायत समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, रेडी पं. स. सदस्य प्रियांका घाटवळ, शिरोडा पं. स. सदस्य योगिता परब, आडेली…

Read Full News

ज्येष्ठ नाट्यकलाकार रतिलाल तारी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान…

अष्टपैलू कलानिकेतन संस्थेतर्फे सन्मान.. ⚡मालवण ता.१४-:अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार तारकर्ली येथील ज्येष्ठ नाट्यकलाकार श्री. आप्पाजी उर्फ रतिलाल श्रीधर तारी यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे नटवर्य कै. राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा तसेच जीवन गौरव पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी मालवण भरड येथील श्री…

Read Full News

क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी ‘स्मृती लीला’ पुरस्कार जाहीर…

रवींद्र तळाशीलकर ; १७ मार्च रोजी गौरव सोहळा… ⚡मालवण,ता.१४-:सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण स्पोर्ट असोसिएशन आणि हडकर कुटुंबियांच्या वतीने आयोजित तसेच सौ. नंदिता राजेश पाटील पुरस्कृत ‘स्मृती लीला पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू गुणवंत व्यक्तिमत्त्वांना दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा सोहळा १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता भरड येथील लीलांजली हॉल…

Read Full News

प्रशासन तुमच्या दारात; खांबाळे येथे राजस्व समाधान शिबिर संपन्न…

⚡वैभववाडी ता.१४-: शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी तसेच प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ राबविण्यात येत आहे. प्रशासन आता तुमच्या दारापर्यंत येत असून या अभियानाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर योजनेअंतर्गत…

Read Full News

You cannot copy content of this page