२० मे रोजी हुमरमळा (वालावल) येथे महाराजस्व समाधान शिबीर…

तहसीलदार सचिन पाटील यांचा शिबीर नियोजनसाठी आढावा..

⚡कुडाळ ता.१७-: मडगाव मंडळ आयोजित हुमरमळा वालावल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर २० मे रोजी हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. याबाबत शनिवारी कुडाळ तहसीलदार श्री सचिन पाटील यांनी मडगाव मंडळ मधील महसुल कर्मचारी यांची आढावा बैठक हुमरमळा वालावल ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
सध्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीरे कुडाळ तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये आयोजित केली जात असुन या शिबिराला नागरीक उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. कुडाळ तहसीलदार सचिन पाटील आणि उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे नियोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवार दिनांक २० मे रोजी हुमरमळा वालावल येथे होणारे शिबीर यशस्वी करण्यासाठी कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी आज आढावा घेतला. त्यांनी सुचना करताना सांगितले की उत्पन्न दाखले, शिधापत्रिका, वारस तपास, वर्ग १,तुकडे बंदी शेरा कमी करणे कलम १५ ५ ने सातबारा दुरुस्ती करणे, लक्ष्मी मुक्ती योजना, कजाप अम्मल, शेतकरी दाखले, ऑन दी स्पाॅट ३२ग आदेश, वारस, राजपत्र, नावात बदल मंजुरी, संजय गांधी निराधार योजना प्रस्ताव ह्या कामांचा या शिबिरामध्ये नागरीकांना फायदा होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ वाजे पर्यंत हे शिबिर चालणार असुन या शिबिराचा तेंडोली, माड्याचीवाडी, हुमरमळा, पाट, आंदुर्ले या तलाठी सजा मडगाव मंडळ मर्यादित गावातील नागरीकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मडगाव मंडळ अधिकारी श्रीम श्वेता दळवी यांनी केले आहे
कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी आज हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये पहीलांदाच भेट तसेच हुमरमळा वालावल तलाठी कार्यालय येथे भेट दिली. हुमरमळा सरपंच अमृत देसाई यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, मंडळ अधिकारी श्रीम श्वेता दळवी, हुमरमळा वालावल तलाठी पुजा भोरे, हुमरमळा वालावल ग्रामपंचायत ग्रामअधिकारी श्रीम अपर्णा पाटील, तेंडोली तलाठी शुभम कनवाडे, मडगाव तलाठी कु वैशाली देसाई, हुमरमळा वालावल गावातील जेष्ठ ग्रामस्थ प्रकाश परब, पोलीस पाटील श्री सुबोध सावंत, अमित बंगे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page