मळेवाड जंक्शन येथे वाहतूक कोंडी…

⚡सावंतवाडी ता.१७-: मळेवाड जंक्शन येथे वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सुट्टीमुळे बरेच पर्यटक जिल्ह्यात आले असून,येथील समुद्र किनाऱ्यावर,पर्यटन स्थळांवर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असून,मळेवाड जंक्शन येथे बऱ्याच वाहनांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने उभी करत असल्याने,सर्वसाधारण पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यटकांबद्धल आदर आहे मात्र बेशिस्त वाहन पार्किंगमुळे अन्य वाहन चालकांना,पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे.
मळेवाड जंक्शन येथे सर्कल च्या मध्यभागी पर्यटक आपल्या ताब्यातील चारचाकी,गाड्या पार्क करत असून,यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

You cannot copy content of this page