डॉ. भीमराव आंबेडकर:कुडाळ मध्ये ९ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात..
⚡कुडाळ ता.१७-: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला समाज टप्प्याटप्प्याने बदलण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी केला. या बदलत्या समाज प्रवाहात डॉ बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा. समाजात क्रांतीनंतर झालेली प्रतिक्रांती थांबविण्यासाठी धम्म प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर यांनी आज नवव्या धम्म परिषदेत कुडाळ येथे केले. जनगणनेमध्ये सुद्धा प्रत्येकाने जागरूक राहून महत्त्वाची भूमिका बजवावी असेही त्यांनी आवाहन केले
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या जिल्हा शाखा सिंधुदुर्ग, महिला जिल्हा शाखा व मुंबई जिल्हा शाखा, समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ९ वी बौद्ध धम्म परिषद रविवारी कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद हाॅल येथे झाली. यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.भीमराव आंबेडकर बोलत होते. या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री भाई गिरकर, राज्य अध्यक्ष यु.जी.बोराडे, पूज्य भन्ते सुमेध बोधी, डाॅ.सतीश पवार, लेखक मंजुल भारद्वाज, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, सरचिटणीस संजय पेंडूरकर, सिंधुदुर्ग जिल्हा मुंबई शाखा जिल्हाध्यक्ष व स्वागताध्यक्ष श्रीकांत कदम, महिला जिल्हा शाखा जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, भन्ते महाकाश्यप, गोवा राज्य अध्यक्ष एस.के.जाधव, माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, मुंबई विभागाचे उपाध्यक्ष भिकाजी वर्देकर, माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम व पं.ध.माणगांवकर, पूर्व मुंबई झोन क्र.५ चे अध्यक्ष अनंत जाधव, समता सैनिक दलाचे मेजर अरूण जाधव, सिनियर डिव्हिजन ऑफीसर संजय जाधव, मुंबई प्रदेश झोन क्र.२ चे प्रभारी संघटक तथा जिल्हा कोषाध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, बाळा चौकेकर, चंदाकासले, तालुका अध्यक्ष निलेश वर्देकर, तालुका सरचिटणीस रामचंद्र वालावलकर, जिल्हा महिला सरचिटणीस अपूर्वा पवार, मोहन जाधव, ज्ञानोबा कांबळे आदींसह जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा तालुका व जिल्हा शाखांचे पदाधिकारी व सदस्य तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यातून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.
डाॅ. आंबेडकर म्हणाले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत असलेल्या सर्व संघटनांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. आज ही धम्म चळवळ गतीमान होत आहे. देशात, राज्यात विचारांची लढाई सुरू आहे. ज्यांचे विचार सकस आहेत त्यांची समाजाला, देशाला गरज आहे. येणाऱ्या भविष्यकाळासाठी डाॅ. बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे. हि विचारांची लढाई कोणी तोडू शकत नाही. आपण सर्वजण डाॅ.बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यांचे अनुयायी आहोत. डाॅ.बाबासाहेबांचे नाव त्यांच्या कार्याने जगभर पसरले आहे. त्यांच्या धम्म क्रांतीत आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे. पुढे जाताना सर्वानी सोबत नेले पाहिजे. संविधानातही डाॅ.बाबासाहेबांची धम्मक्रांती महत्त्वाची आहे. आपण मागे हटणारे लोक नाहीत. संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. समाजासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी चालेल. उपवर्गीकरण हानून पाडण्यासाठी संघर्ष करूया. जनगणनेसाठीही तयार रहा. येणाऱ्या जनगणनेत महत्त्वाची भूमिका बजावत जागरूकता दाखवा, असे डाॅ. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. तसेच हि परिषद यशस्वी केल्याबद्दल आपण सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
भाई गिरकर म्हणाले, या जिल्ह्यात भिक्खू संघ नाही. जिल्ह्यात बौद्ध धम्माचे संस्कार झाले पाहीजेत. जिल्ह्यात बौद्ध महासभेची टीम चांगल्याप्रकारे काम करीत आहे. सर्वानी मेहनत घेऊन जिल्हा बौद्धमय करूया. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांचे नाव घेणे सोपे आहे पण त्यांना आत्मसात करणे कठीण आहे. परंतु त्यांना सर्वानी आत्मसात केले पाहीजे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत.
राज्य अध्यक्ष बोराडे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान कशी करावी याबाबत सखोलपणे मार्गदर्शन केले. भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका व जिल्हा कार्यकारिणी गठीत करताना त्यात 40 टक्के तरूणांना सहभागी करून घ्यावे. ही संस्था गतीमान झाली पाहीजे, त्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहावे. समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेली व्यसनाधीनता वेळीच रोखावी. अंधश्रद्धा दूर करावी. त्यासाठी प्रबोधन घ्यावीत. गाव तेथे शाखा, गाव तेथे बौद्धाचार्य असले पाहिजेत. जेणेकरून आपले कार्य अधिक गतीमान होईल.
जिल्हा अध्यक्ष आनंद कासार्डेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांच्या सहकार्यातून नववी धम्म परिषद यशस्वी झाली महाराष्ट्रसह गोवा राज्यातील अनेकांनी उपस्थितीत राहून हा सोहळा नेत्र दीपक केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेंडूरकर
व अपूर्वा पवार यांनी केले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा डॉ भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आभार आर डी चेंदवणकर यांनी मानले.
