⚡सावंतवाडी ता.१८-: मळेवाड पंचक्रोशीत सायंकाळपासून विजेचा लपंडाव सुरू झाला असून,पावसाच्या सरी सुरू होताच वीज पुरवठा गायब होण्याचा प्रकार घडत आहे.वीज पुरवठा सारखा सारखा खंडित होत असून यामुळे विद्युत उपकरणांना धोका निर्माण झाला आहे. विद्युत उपकरणे निकामी होत आहेत.
यामुळे वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला असून,पाऊस सुरू व्हायच्या आधीच जर विद्युत पुरवठा सुरळीत नाही तर ,पुढे पावसाळ्यात काय स्थिती होणार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाच्या आधी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची कामे करणे गरजेचे असताना सुद्धा अजूनही नियोजित कामे हाती न घेतल्याने पावसाळ्यात विद्युत पुरवठा कसा काय सुरळीत राहणार ?त्यामुळे लवकरात लवकर ही कामे हाती घेऊन ग्राहकांना होणारा त्रास कमी करावा हीच संबंधित विभागाकडून अपेक्षा.
तसेच या संबंधी कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी बंद असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यामुळे संपर्क करणे सुद्धा शक्य होत नाही.एखादी दुर्घटना घडल्यास तत्काळ संपर्क कोणाकडे करणार? असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांनी उपस्थित केला आहे.
मळेवाड पंचक्रोशीत विद्युत पुरवठा चा धुमशान…
