साटेली येथे उद्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन

अनिकेत मांजरेकर मित्रमंडळाचा पुढाकार..

⚡सावंतवाडी ता.१८-: साटेली तर्फ सातार्डा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये मंगळवार दि. १९ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मांजरेकर व मित्रमंडळ तसेच बांदा येथील डायग्नोस्टिक, पॉलीक्लिनिक व आयकेयर सेंटर, कुडाळ येथील सुयश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात बी. पी, शुगर,ई सी .जी तपासणी करण्यात येणार आहे.बांधकाम करणाऱ्यांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.रेशनकार्ड धारकांना नेत्रपटल शस्त्रक्रिया व इंजेक्शन, तिराळेपणा, अश्रूपिशवी, काचबिंदू हया शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत.मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन अनिकेत मांजरेकर मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page