⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला शहरातून मठमार्गे सावंतवाडी – कुडाळकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांवर वाळू ओतण्यात आली असून काम करण्यात येत आहे. शहरातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मारुती मंदिर हा मुख्य स्टॉप आहे. त्यामुळे येथे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात एस. टी. साठी प्रवासी थांबतात. तसेच सर्वच वाहनांची मोठी वाहतूक सुरु असते. परंतु मुख्य मार्गांवर बिनधास्तपणे काम करण्यात येत असून यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. याकडे संबंधित शासनाचे दुर्लक्ष का, असा सवाल नागरिक तसेच वाहनधारकांतून करण्यात आला आहे. काहीवेळा गोरगरीब जनतेचे असेच काम सुरु असते तर त्वरित कारवाई करण्यात येते.त्यामुळे शासनाने मुख्य मार्ग असल्याने त्वरित लक्ष पुरवावे, अशी मागणी वाहनधारकातून करण्यात आली आहे.
वेंगुर्ला मारुती मंदिर स्टॉप येथे मुख्य मार्गांवर वाहतुकीस अडथळा…
