जिल्हा कार्यकारीणीची निवड:जिल्हाध्यक्षपदी आत्माराम साटेलकर..
⚡कुडाळ ता.१८-: कुडाळ येथे जिल्हातील बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगार यांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या. यावेळी जिल्हा कार्यकारिणीची निवड देखील करण्यात आली.
बांधकाम कामगारांच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कामगारांना प्रामुख्याने भेडसावत असलेली अडचण म्हणजे, काही गावांमध्ये ग्रामसेवक सही देत नाहीत. तसेच शिष्यवृत्ती सारखे लाभ अजूनही प्रलंबित आहेत. त्या बद्दल कामगार वर्गाने आपल्या अडीअडचणी व्यक्त केल्या. त्यावर श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी ग्रामसेवक सही विषयी आपण गावामधे सर्व कामगार वर्गाची बैठक लावा, मी येतो. त्या ठिकाणी आपण तक्रारी विषयी सदर ग्रामसेवक यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा करुया आणि चर्चेअंती सदर ग्रामसेवक यांनी सही देण्यास नकार दिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे व आमदार यांच्या जवळ तक्रार करून सदर प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे सांगीतले.
कामगार वर्गाच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कामगार यांच्या खात्यात पैसे लवकरच जमा होणार आहेत. अशी माहिती अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली.
श्रमिक कामगार ही संघटना तळागाळातील कामगार वर्गासाठी काम करत आहे. त्या अनुषगाने श्रमिक कामगार संघटना सर्व कामगार वर्गाकडे पोहोचावी. कामगारांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी म्हणून सभेमध्ये जिल्हा व तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी आत्माराम साटेलकर सचिव पदी नामदेव जानकर, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बळी, महिला जिल्हा अध्यक्ष अंतरा गावडे, जिल्हा सचिव पदी संजना पाटकर, कुडाळ तालुका अध्यक्ष पदी दत्ताराम वारंग, कुडाळ तालुका सचिव रविंद्र गुरव, दोडामार्ग तालुका अध्यक्ष भैरु पाटील, मालवण तालुका अध्यक्ष दीपक देऊलकर, कुडाळ महिला तालुका अध्यक्ष रसिका कदम, कुडाळ उपाध्यक्ष योगेश घावनळकर, कविलकट्टा प्रभाग अध्यक्ष प्राची पावसकर, बांबुळी प्रभाग अध्यक्ष पदी दिपश्री परब, कुडाळ उपाध्यक्ष शंकर पालकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सर्वांची नियुक्ती श्रमिक कामगार संघटना प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या सभेला कामगार रसिका चव्हाण, आरती सावंत, रश्मी भरणकर, आत्माराम सावंत, भरत परब, यशवंत जळवी, राजन ताम्हणकर, प्रकाश सावंत, रामदास नाईक उपस्थित होते. यावेळी नूतन जिल्हा अध्यक्ष आत्माराम साटेलकर व अंतरा गावडे यांनी कामगार यांच्या प्रश्नांसाठी आपली संपूर्ण श्रमिक संघटना सदैव आपल्या पाठीशी आहे, आपण सर्वजण असेच एकत्र होऊन काम करुया, आज आपण एकत्र झालो तर लवकरच येणाऱ्या काळात संघटना भक्कमपणे बांधणी करून तळागाळातील कामगार वर्ग एकत्र करूया. आपली संघटना भक्कम करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया व कामगार वर्गाला येणाऱ्या अडीअडचणी यांना आपण सर्वजण मिळून तोंड देऊ व प्रश्न सोडवू असे सांगितले.
