⚡सावंतवाडी ता.१८-: महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार प्राप्त साईल तळकटकर यांना कोकणची लोकप्रिय कलेतुन राज पाञ साकारून त्याला अभ्यासपुर्वक प्रबोधनाच्या माध्यमातुन पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या मनात आदर युक्त स्थान निर्माण केल. दशावतार कंपनीतुन किंवा संयुक्त दशावतार यातुन आपली कला सादर केली हे हेरून राजधानी सेवा प्रतिष्ठान आणि अनुश्री फाऊंडेशन, कराड सातारा यांनी सर्व कलेचे परिक्षण करून कोकणातली दशावतार कलेतील कलाकारांचे परिक्षण करून सिंधुदुर्गातुन साईल तळकटकर यांचे नाव पुरस्कारावर कोरण्यात आले हा सन्मान सोहळा कराड, सातारा येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. साईल तळकटकर यांना पुरस्कार प्राप्त झाला हे कळताच मनसे उपजिल्हा अध्यक्ष सुधीर राऊळ यांनी साईल तळकटकर यांच अभिनंदन केल आणि मनसे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संपर्क अध्यक्ष संदिप दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी मनसे जिल्हाअध्यक्ष अनिल केसरकर, उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, जिल्हा सचिव गुरूदास गवंडे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष विनायक सावंत, सावंतवाडी तालुकाअध्यक्ष मिलींद सावंत, तालुका सचिव सतिश आकेरकर, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, उमेश कदम इ. उपस्थित होते.
साईल तळकटकर यांचा मनसे कडुन सत्कार…
