Headlines

स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृतिप्रीत्यर्थ रंगभरण-चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१६-: स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून आयोजित तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. रंगभरण स्पर्धेत धन्विका सचिन मुळीक तर…

Read Full News

अध्यक्ष पदासाठी प्रमोद कामत, उपाध्यक्ष पदासाठी दादा साईल यांचे अर्ज दाखल…

ओरोस ता १६सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीच्यावतीने बांदा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या प्रमोद कामत यांनी अध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाचे सदस्य तुकाराम उर्फ दादा साईल यांनी अर्ज दाखल केला आहे. दुपारी ३ वाजता खास सभेद्वारे या दोन्ही…

Read Full News

सुधीर आडवडेकर, दिलीप भालेकर यांनी दिल्या प्रमोद कामत यांना शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१६- : जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित झाल्यानंतर सावंतवाडी येथे त्यांच्या समर्थकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत कामत यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सावंतवाडी भाजपचे नगरसेवक तथा सभापती सुधीर आडीवरेकर तसेच भाजप सावंतवाडीचे सरचिटणीस दिलीप भालेकर यांनी प्रमोद कामत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर…

Read Full News

मठ टाकयेवाडी येथील धोकादायक स्थितीमुळे वाहनास धोका…

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला मठमार्गे कुडाळ – सावंतवाडी कडे जाणाऱ्या मार्गांवर मठ एरियात अंडरग्राउंड विजवाहिन्याचे काम सुरु आहे. काम व्यवस्थित झाले असले तरी बऱ्याचशा त्रुटी राहिल्या असल्याने ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार – सबठेकेदार यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान मठ टाकयेवाडी येथील धोकादायक वळणावर अपुऱ्या कामामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसात वाहने घसरून किरकोळ अपघात…

Read Full News

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ४० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप…

गुरु मठकर यांचा उपक्रम:उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक… सावंतवाडी ता.१६: आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी गुरु मठकर यांनी ४० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. समाजाभिमुख उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवत यंदाही हा उपक्रम राबविला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरु मठकर यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांना सायकली प्रदान केल्या….

Read Full News

वाफोली–विलवडे भागात क्वारी-क्रशर विरोधात उद्या धरणे आंदोलन…

⚡बांदा ता.१६-: वाफोली–विलवडे परिसरात सुरू असलेल्या विनापरवानगी क्वारी व क्रशर प्रकल्पांच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यासाठी उद्या मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता वाफोली-विलवडे सीमेजवळील क्रेशर रोड येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने गुणेश गवस यांनी दिली आहे.वाफोली व विलवडे या…

Read Full News

वेंगुर्ला शहरात 8,000 रुपयाची गोवा बनावटी दारू जप्त…

दाभोली गावातही त्वरित धाडसत्र मोहीम हाती.. वेंगुर्लावेंगुर्ला पोलिसांनी दारू विक्री विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. शनिवारी रात्री 9.30 वा. च्या सुमारास वेंगुर्ला शहरातील बीएसएनएल ऑफिस समोरील रोडवर8000 रुपयाची गोवा बनावटी दारू जप्त केली आहे. वेंगुर्ला पोलीस स्थानकाचे वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, पोलीस हवालदार भगवान चव्हाण, प्रथमेश पालकर आदी पेट्रोलिंग करत असताना एक इसम…

Read Full News

संजू परब आणि माझं नातं हे कधीच तुटणार नाही…

आमदार निलेश राणे: केक कापून वाढदिवस केला उत्साहात साजरा.. ⚡सावंतवाडी, ता.१५-:माझे दिवस चांगले असो, किंवा वाईट, संजू परब नेहमी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. गेली दहा वर्षे मी राजकारणातून बाजूला पडलो होतो, मात्र संजू परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा राजकारणात सक्रिय केले आणि आमदार होईपर्यंत साथ दिली. त्यामुळे त्यांचे उपकार मी…

Read Full News

वेंगुर्ला शहरातील युवा व्यावसायिक फसवणूक प्रकरणी तिसऱ्या संशयितास रत्नागिरी येथून ताब्यात…

⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला शहरातील एका नव युवा व्यावसायिकाची ( ऑनलाईन गेमिंगद्वारे ) फसवणूक केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी जलदगतीने तपास करीत दोन संशयितास ताब्यात घेतले होते. यामधील महिलेच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली होती. तर दुसऱ्या संशयितास न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यामधील कणकवली येथील महिलेस कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची जामिनावर मुक्तता केली…

Read Full News

देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत 71 प्रकरणे निकाली…

⚡देवगड ता.१५-:उच्च न्यायालय- मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीकांत एस. पचंडी यांच्या हस्ते झाले. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा…

Read Full News

You cannot copy content of this page