कुडाळ प. स. मध्ये उद्या शेळीपालन मार्गदर्शन शिबीर…

⚡कुडाळ ता.१९-: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि कुडाळ तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय कुडाळ यांच्या माध्यमातून
२० मे रोजी ‘पशुसंवर्धन दिन’च्या औचित्याने ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली अर्थात किफायतशीर शेळीपालन या विषयावर १ दिवसीय मार्गदर्शन शिबीर पंचायत समिती सभागृह कुडाळ येथे सकाळी दहा ते
दुपारी एक या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती मिलिंद नाईक असणार आहेत. उद्घाटन
उपसभापती सिताराम तेली, याच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सिंधुदुर्ग डॉ. समिर  बिलोलीकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कुडाळ मनोज  भोगटे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रविण हिर्लेकर, सहायक गटविकास अधिकारी संजय ओरोसकर, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य / सदस्या, यांची उपस्थिती असणार आहे . या मार्गदर्शन शिबिराला सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. रविंद्र दळवी, सहाय्यक आयुक्त तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय, कुडाळ डॉ. अभिजीत कसालकर, सहाय्यक आयुक्त, तालुका पशु वैद्यकिय चिकित्सालय कुडाळ डॉ. प्रज्ञा ओजस ओहोळ, पशुवैद्यकिय अधिकारी, पशुवैद्यकीय चिकित्सालय माणगांव डॉ. निकिता तांबे, पशुवैद्यकिय अधिकारी, पशुवैद्यकीय चिकित्सालय बिबवणे डॉ. मृणाल वरठी, मार्गदर्शन करणार आहेत.
सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रज्ञा ओजस ओहोळ, डॉ. अभिजीत कसालकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page