⚡सावंतवाडी ता.१९-: सकल हिंदू संमेलन समन्वय समिती तर्फे सामाजिक क्षेत्रामध्ये अविरत निस्वार्थपणे कार्य करणारे सिंधु मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आनंद मिस्त्री यांचा सत्कार शिवचरित्रकार व अध्यक्ष हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्याचे डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांचा सत्कार कीर्तनकार ह.भ.प.श्री विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी महाराज युवा कीर्तनकार ह.भ.प. सायलीताई गावडे तसेच मुख्य समन्वयक ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्गचे
श्री अमित नाईक उपस्थित होते. हिंदू ,धर्म, परंपरा,संस्कृती, मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सकल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते. या सकल हिंदू संमेलनाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. हे संमेलन राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
