Headlines

सावंतवाडीत युवा वैश्यवाणी प्रिमिअर लीगचा उत्साहात शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१५-: हिंदू वैश्यवाणी युवा संघटना सावंतवाडीकडून आयोजित युवा वैश्यवाणी प्रिमिअर लीगचा शुभारंभ करण्यात आला. माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. दोन दिवस या क्रिकेट स्पर्धा रंगणार आहेत. जिमखाना मैदान येथे या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला….

Read Full News

मळगाव येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास…

शिवशंभू ग्रुप मळगावचा उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.१४-: स्वराज्यासाठी व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत झुंज देणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मृतींना उजाळा देणारा विशेष उपक्रम मळगाव येथे सध्या सुरू आहे. जिल्हा परिषद शारदा विद्यालय, मळगाव रस्ता येथील शालेय मैदानात १८ फेब्रुवारीपासून बलिदान मासाचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम सलग १८ मार्चपर्यंत अखंडितपणे चालणार आहे.छत्रपती…

Read Full News

प्रगतशील शेतकरी अभिजीत (राजू) पवार यांना राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर…

⚡वैभववाडी ता.१४-: स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मानाचा राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार वैभववाडी येथील प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजक श्री. अभिजीत (राजू) दशरथ पवार यांना जाहीर झाला आहे. शेती, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार…

Read Full News

श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेत शैक्षणिक उपक्रमांतर्गत गावठी बाजार…

⚡सावंतवाडी ता.१४-: श्री कलेश्वर विद्या मंदिर, वेत्ये शाळेत काल शुक्रवार, (१३ मार्च रोजी) शैक्षणिक उपक्रमांतर्गत शाळा पातळीवर गावठी वस्तूंचा बाजार भरविण्यात आला. या उपक्रमात विविध प्रकारच्या घरगुती वस्तू, ताज्या भाजीपाल्याच्या विक्रीसह खाद्यपदार्थ व थंड पेयांचे स्टॉल लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या बाजाराचे उदघाटन वेत्ये सरपंच गुणाजी गावडे व पंचायत…

Read Full News

आदिशक्ती अभियानात ग्रामपंचायत कळसुलीचा डंका…

जिल्ह्यात द्वितीय तर कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक.. ⚡कणकवली ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या सन २०२५ मधील आदिशक्ती अभियान स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात कळसुली ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवणारी ग्रामपंचायत ठरली आहे. आदिशक्ती अभियानांतर्गत आवश्यक असलेल्या विविध कार्यक्रमांची प्रभावी…

Read Full News

जिल्ह्यात २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू होणार…

मनीष दळवी यांची माहिती: विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे चेअरमन, सचिव काजू कारखानदारांच्या बैठक संपन्न… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी सहकाराच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी…

Read Full News

सिंधुदुर्गच्या भूमीत प्रथमच घुमणार नागेश आडगावकरांचे स्वर…

निरवडे महोत्सवात ४ एप्रिलला रंगणार स्वराभिषेक;​भजन प्रेमींसाठी अभंगवाणीची मेजवानी… ⚡सावंतवाडी, ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक वैभवात मोलाची भर टाकणाऱ्या ‘निरवडे महोत्सव २०२६’ च्या निमित्ताने भजन प्रेमी आणि संगीत रसिकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळाच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७…

Read Full News

मालवण लायन्स क्लबतर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याचा गौरव…

⚡मालवण ता.१३-:लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले यांचा मालवण लायन्स क्लब भेट कार्यक्रम दैवज्ञ भवन, मालवण येथे संपन्न झाला. यावेळी लायन्स क्लबतर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले, मालवण लायन्स क्लबच्या अध्यक्ष अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, खजिनदार पूनम चव्हाण, सौ. विनया…

Read Full News

रोटरी क्लबतर्फे कट्टा येथे कष्टकरी महिलांचा सन्मान…

⚡मालवण ता.१३-:महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवणतर्फे कट्टा, गुरामवाड, नांदोस येथील टोपल्या विणणाऱ्या, मातीकाम करणाऱ्या तसेच फुलांचे हार करून विकणाऱ्या आठ कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. कट्टा येथे बॅ. नाथ पै सेवांगण सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी रुपाली परुळेकर, राजश्री कुडाळकर, स्मिता गोठणकर, संगीता माने, वत्सला माने, सुरेखा तांबट, मंगल माने, वैशाली…

Read Full News

देवली येथील पारंपारिक ‘कनो घालणे’ स्पर्धेत आर्या मेस्त्री प्रथम…

⚡मालवण ता.१३-:मालवण तालुक्यातील वरची देवली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून ऊर्जा महिला मंडळ, वरची देवली आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पारंपारिक ‘कनो घालणे’ स्पर्धेत आर्या शामसुंदर मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकावला. वरची देवली येथील सौ. प्रिया नरेश चव्हाण यांच्या निवासस्थानी ही स्पर्धा संपन्न झाली. या…

Read Full News

You cannot copy content of this page