⚡दोडामार्ग ता.१५-:
दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून दोडामार्ग तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी दोडामार्ग इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी चिन्मयी जयराज खानोलकर हिने ९६.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच न्यू इंग्लिश स्कूल, मेढी येथील विद्यार्थी चैतन्य मंदार फातर्पेकर याने शाळेत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.
नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. “विद्यार्थ्यांच्या यशामुळे दोडामार्गच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गावस यांच्यासह मान्यवर व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
दोडामार्गात नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…
