धाकोरे परिसरात अवैध मांस तस्करीच्या संशयावरून थरार…?

नील प्रभू झांट्ये व रूपम प्रभू झांट्ये यांच्या धाडसाचे सर्वत्र होतय कौतुक..

⚡सावंतवाडी ता.१५-: आजगाव धाकोरे परिसरात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अवैध मांस वाहतूक करणारा संशयित व त्या संशयिताला पकडण्यासाठी पाठलाग करणारे शिव प्रतिष्ठान चे धारकरी नील प्रभू झांट्ये व रूपम प्रभू झांट्ये यांच्यात एक थरारक घटना घडली आहे.

संशयास्पद मांसाची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीने आपला पाठलाग करणाऱ्या नील प्रभूझाटये या तरुणाच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

शिरोडा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल दीपा मठकर,हवालदार प्रसाद कदम ,वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण व त्यांचे सहकारी तसेच शिरोडा पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका टीकोरे , मळेवाड चे डॉ सुनाद बाळगे ,वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.

यावेळी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत संशयिताला पकडून शिक्षा देण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित हा या परिसरात सातत्याने अवैध मांस तस्करी करत असल्याचा त्यांना संशय होता. यापूर्वीही अनेकदा त्याचा पाठलाग करण्यात आला होता. आज पुन्हा एकदा पाठलाग सुरू असताना, तस्कराने नील व रूपम प्रभू झांट्ये यांच्या अंगावर थेट गाडी घातली. यावेळी नील रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांत गेल्याने सुदैवाने बचावला. दोघांनी ही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी वेगाने गाडी चालवत निसटून गेला.
पाठलाग सुरू असताना आरोपीने आपल्याकडे असलेले संशयित मांस धाकोरे येथील मारुती मंदिर शेजारील शेतकरी उदय कृष्ण मुळीक यांच्या काजू बागेत टाकून फरार झाला .
सदरील घटना समजता धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक,निलेश मुळीक,ओंकार प्रभू,श्रीराम प्रभूराळकर,पंचायत समिती सदस्य तथा भाजप जिल्हा चिटणीस महेश धुरी ,गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जप्त केलेले हे मांस नेमके कशाचे आहे, हे अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेले नाही. पोलिसांनी हे मांस ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.
संबंधित आरोपीवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. तो अत्यंत धोकादायक पद्धतीने गाडी चालवून कोणाच्याही जीवाशी खेळू शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून, जप्त केलेल्या मांसाचा अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर बाबी स्पष्ट होतील.

You cannot copy content of this page