⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला तालुक्यात मागील आठवड्यात शुक्रवारी 8 मे रोजी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यावेळी आडेली खुटवळवाडी एरियातील स्ट्रीटलाईट्स तारावर फ़ांद्या तुटून पडल्याने स्ट्रीटलाईट्स विजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत संबंधित विभागास ग्रामस्थांनी माहिती देऊनही अद्यापपर्यंत याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विजवितरण तालुक्यात चांगले काम करीत असतानाही आडेली खुटवळवाडी येथील स्ट्रीटलाईट्स पुरवठा नियमित सुरु ठेवण्यास टाळाटाळ का केली जातेय ? असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे. आडेली येथील ग्रामपंचायत कर्मचारी संतोष धर्णे यांनी वारंवार कल्पना देऊनही संबंधित विभागाचे याकडे “कायम ” या एरियाकडे दुर्लक्ष केले जाते. गावातील नागरिक एकसारखा वीजकर भरूनही व मुख्य मार्ग असूनही अन्य भागात चांगल्या क्वालिटीचे व आडेली खुटवळवाडी
या एरियात वारंवार ‘दुय्यम’ दर्जाचे विद्युत दिवे लावले जातात, ही शोकांतिका आहे.
आमदार दिपक केसरकर यांनी येथील भागात मागणीनुसार त्वरित निधी उपलब्ध करून देत स्टीटलाईट्स सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु शासन मात्र परिपूर्ण सेवा का देत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
याबाबतीत वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांनी गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आडेली खुटवळवाडी येथे स्ट्रीटलाईट्स समस्या ; शासनाचे दुर्लक्ष…
