“राजकीय स्टंटबाजी थांबवा ; भाजप नेत्यांवर बेताल वक्तव्ये खपवून घेणार नाही”…

जामसंडेतील आंदोलनावर भाजपाचा पलटवार:माजी आमदार अजित गोगटे व जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांचा इशारा..

⚡देवगड ता.१७-:
जामसंडे येथे उबाठा व काँग्रेसच्या उरल्यासुरल्या लोकांनी केलेले आंदोलन व कृती याचा भाजपा पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करीत असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल बेताल वक्तव्ये केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे व भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिला.राज्य शासन शेतकèयांचा पाठीशी खंबीरपणे उभे आहे.निकषांना बगल देवून राज्यशासनाने नुकसानभरपाई जाहीर केली.नुकसानभरपाई वाढवुन देण्यासाठी शासनही सकारात्मक आहे. मात्र याचे कौतुक करावे असे विरोधकांना कधी वाटले नाही.बागायतदार,शेतकरी यांच्यासमवेत नाही.आंदोलने करून केवळ राजकीय स्टंटबाजी करीत आहेत असा आरोप यावेळी गोगटे व साटम यांनी केला.

जामसंडे येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.संदीप साटम यांनी जामसंडे येथे केलेल्या आंदोलनाचा तीव्र शब्दात निषेध केला.उबाठा व काँग्रेसच्या उरल्यासुरल्या कार्यकत्र्यांनी केलेले आंदोलन व कृती याचा निषेध करून वरिष्ठ नेत्यांबाबत बेताल वक्तव्ये केल्यास खपवुन घेणार नाही असा इशारा दिला.मुंबई व जामसंडे येथे केलेल्या आंदोलनामध्ये बागायतदार व सर्वसामान्य शेतकरी नव्हते.हे आंदोलन राजकीय होते.मुंबई येथिल मोर्चाही राजकीय होता.बागायतदार व शेतकरी आता त्यांच्यासमवेत नाहीत.कोकणच्या इतिहासात विशेष बाब म्हणून तापमानातील कमी-जास्त प्रमाण, कीड प्रादूर्भाव अशा निकषानुसार पहिल्यांदाच नुकसानभरपाई दिली आहे.मात्र याचे कौतुक करावे असे विरोधकांना कधी वाटले नाही.शिक्षणमंत्र्यांसमवेत बैठक घेवून पालकमंत्री नितेश राणे कमी पटसंख्याअभावी बंद पडणाèया शाळा सुरू करण्याबाबत चांगला निर्णय घेतला.याबाबत विरोधकांनी कौतुक केले नाही.विरोधकांनी शाळा वाचले तर पालकमंत्र्यांचा आम्ही सत्कार करून असे वक्तव्य केले होते.आता शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय झाल्याने विरोधकांनी पालकमंत्र्यांचा सत्कार करावा.त्यांचा सत्काराचा दर्जा कळू दे असा उपरोधिक टोला साटम यांनी लगावला.

आंदोलन करणारे उबाठा काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यामध्ये बागायतदार व शेतकरी नव्हते.राज्यसरकारने निकष बदलून मदत जाहीर केली.कर्जमाफी करण्याबाबतची घोषणाही केली आहे.बागायतदारांनी यांच्या भुलथापांना बळी पडू नये असे आवाहन अजित गोगटे यांनी केले.प.महाराष्टड्ढाच्या स्टाईलने येथे आंदोलने करू नये असा टोलाही त्यांनी लगावला.यावेळी बाळा खडपे, भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, नगरसेवक शरद ठुकरूल, शहरअध्यक्ष वैभव करंगुटकर, योगेश पाटकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page