देवगड-जामसंडे न.पं.ने कोविड सेंटरमधील कचरा साठवुन ठेवल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य
कचऱ्याची विल्हेवाट लावा अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन छेडणार:तुषार पेडणेकर *⚡देवगड ता.०५-:* देवगड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये वैदयकिय अधिकारी निवास स्थानाच्या मालमत्तेच्या ईमारतीमध्ये देवगड-जामसंडे नगरपंचायतीने कोव्हिड सेंटरमधील ओला व सुका कचरा साठवुन ठेवल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे तरी सदरचा ईमारतीमधील साठवुन ठेवलेल्या कच-याची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा देवगड शिवसेना पक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनाव्दारे…
