कचऱ्याची विल्हेवाट लावा अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन छेडणार:तुषार पेडणेकर
*⚡देवगड ता.०५-:* देवगड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये वैदयकिय अधिकारी निवास स्थानाच्या मालमत्तेच्या ईमारतीमध्ये देवगड-जामसंडे नगरपंचायतीने कोव्हिड सेंटरमधील ओला व सुका कचरा साठवुन ठेवल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे तरी सदरचा ईमारतीमधील साठवुन ठेवलेल्या कच-याची तात्काळ विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा देवगड शिवसेना पक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा निवेदनाव्दारे नगरपंचायतीच्या मुख्याधिका-यांना शिवसेना विभाग प्रमुख तुषार पेडणेकर यांनी दिला आहे. या निवेदनामध्ये असे म्हटले आहे कि, देवगड येथील कोव्हिड सेंटरच्या समोरील ग्रामीण रुग्णालय देवगड यांच्या वैदयकिय अधिका-यांचे निवास स्थान आहेत. या निवास स्थानामध्ये देवगड-जामसंडे नगरपंचायतीने कोव्हिड सेंटरमधील ओला व सुका कचरा हा गेली कित्येक दिवस त्या ईमारतीमध्ये साठवुन ठेवण्यात आला आहे. या ईमारतीमध्ये साठवून ठेवलेला ओला व सुका कचरा कुजून त्या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे समोरील कोव्हिड सेंटर व शासकिय कार्यालये असल्यामुळे याचा नाहक त्रास येथील कर्मचा-यांसहित जनतेला होत आहे. व आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही हा कचरा धोकादायक बनला आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायत स्वच्छतेचे संदेश जनतेला देत असतानाच स्व्त मात्र कच-याचे साम्राज्य् निर्माण करुन दुर्गधी पसरवित आहे. यामुळे देवग्ड-जामसंडे नगरपंचायतीचे सदरचा कचरा हा अन्य्त्र ठिकाणी हलविला नाही तर शिवसेना आपल्या पध्दतीने नगरपंचायतीच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा ईशारा शिवसेना विभाग प्रमुख तुषार पेडणेकर यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
