जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

*⚡मालवण दि.०५-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS) च्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही वरीष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेकरिता पूर्व नोंदणी करण्याची आवश्‍यकता नाही. विद्यार्थांनी एकाच email id चा वापर करावा. स्पर्धेची लिंक दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल व ११.१७ मिनिटानी बंद होईल. स्पर्धेमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनावर आधारित एकूण २० बहुपर्यायी प्रश्न असतील. एकूण वेळ १७ मिनिटे असेल. स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लिंक वरून ऑनलाइन परीक्षा देता येईल. सहभागी विद्यार्थ्यांमधून सर्वात जास्त गुण मिळवणारे पहिले तीन नंबर काढण्यात येतील व त्यांना त्यांच्या मेल वर स्वतंत्र सर्टिफिकेट पाठविण्यात येईल. तसेच स्पर्धेमध्ये पास होणार्‍या म्हणजे ५०% गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना Auto Generate Appreciation Certificate मिळेल. स्पर्धेची लिंक व अधिक माहिती साठी अधिक माहितीसाठी विद्यार्थांनी प्रा. एस. पी. खोबरे, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी (७५८८१३३९७२) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना मध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.उज्ज्वला सामंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page