खारेपाटण गटविकास सोसायटीतर्फे पूरग्रस्त नागरिकांना धान्य वाटप

*⚡कणकवली दि.०५-:* खारेपाटण येथे पूर आल्यानंतर अनेक कुटुंबांच्या घरात तर काही व्यापाऱ्यांच्या दुकानात पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले होते. या खारेपाटण मधील पुरबाधीत नागरिकांना खारेपाटण गटविकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण यांच्यावतीने मोफत धान्य वाटप करण्यात आले. खारेपाटण सोसायटीच्या सरकारमान्य रास्त धान्य दुकानात झालेल्या या कार्यक्रमात खारेपाटण सोसायटीचे चेअरमन विजय देसाई यांच्या हस्ते पूरग्रस्त पूरबाधित नागरिकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी खारेपाटण गावचे उपसरपंच व सोसायटीचे माजी व्हाईसचेअरमन इस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, सामाजिक कार्यकर्त्या व दक्षता समिती सदस्या सौ. मीनल तळगावकर, शिवाजी राऊत, सोसायटीचे सेक्रेटरी अतुल कर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page