सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १३ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०५-:* सावंतवाडी तालुक्यात आज १३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात बाहेरचा वाडा १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात इन्सुली ४, शेरले, आंबेगाव, आजगाव, निगुडे, आरोंदा, कारीवडे येथे प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्य स्थितीत तालुक्यात १६३ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page