अन्यथा सामान्य माणसाला प्रवास करणे कठीण होऊन बसेल

नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांचे प्रतिपादन

*⚡कणकवली दि.०५-:* कोकण रेल्वेचे खाजगीकरण व्हायला द्यायचे नसेल तर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.अन्यथा खाजगीकरण झाले तर अदानी- अंबानी यांच्या हातात रेल्वे जाऊन सामान्य माणसाला प्रवास करणे कठीण होऊन बसेल असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले. कणकवलीत रेल्वे कामगारांच्या हिताचे प्रश्न नेहमीच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने प्रमुखाने मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपणच बाजी मारणार असेही नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी बोलताना सांगितले.रेल्वे युनियनच्या निवडणुकीवेळी कणकवलीत दाखल झाल्यानंतर ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत कणकवली रेल्वे कामगार संघटनेचे सचिन सरगंले, संजय करिवले, संतोष बापट, प्रशांत सावंत, संदीप संरगले, कांबळे, तांबे, खामकर, वडवळकर, गुरव,सावंत, आदी कर्मचारी उपस्थित होते, कोकणात आल्यावर कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही.कारण मधु दंडवते नसते तर कोकण रेल्वे झालीच नसती असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page