Headlines

रात्रीचे बारा वाजले तरी संजूच्या सावंतवाडीत तुफान गर्दी

जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीयमंत्री राणेंकडून संजू परब यांचे कौतुक *⚡दोडामार्ग ता.२९-:* जिल्ह्यात सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेस जिल्ह्यातील जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, काल रात्री सुमारे १२ च्या दरम्याने जन आशीर्वाद यात्रा सावंतवाडीत दाखल झाली होती. परंतु, रात्री एवढा उशीर होऊन देखील आमच्या संजूच्या सावंतवाडीत तुफान गर्दी जनतेने आशीर्वाद देण्यासाठी केली होती. ही गर्दी केवळ…

Read More

चतुर्थी नंतर पंधरा दिवसांत चिपी विमानतळ सुरू करणार

मंत्री नारायण राणे : बांद्यात जन आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद *⚡बांदा दि.२९-:* चिपी विमानतळ आम्ही आज सुरू करतो, उद्या सुरू करतो असे म्हणत दोन वर्षे उलटून गेली परंतु अद्याप काही विमानतळ सुरू झाले नाही. गणेशोत्सवानंतर पंधरा दिवसांत चिपी विमानतळ वाहतुकीस सुरू करणार असल्याची ग्वाही, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. बांदा येथे जन आशीर्वाद यात्रेत…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

*⚡कणकवली ता.२९-:* देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या माध्यम विभागातर्फे ‘गेल्या ७५ वर्षात देशाने काय कमावले ? काय करायचे बाकी आहे ?’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली असून पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 75 हजार, 50 हजार व 25 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील तसेच…

Read More

ठाकरे सरकारच्या बघ्याच्या भूमिकेमुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा टांगणीवर

भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांचा आरोप *⚡कणकवली ता.२९-:* ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसल्यामुळेच शुक्रवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालढकल केली आहे, असा थेट आरोप भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. अगोदर आरक्षणाबाबत न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडता ठाकरे सरकारने…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४७हजार ८६१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ५३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

गीत गायन स्पर्धेत नील बांदेकरची हॅट्रिक

*⚡सावंतवाडी ता.२९-:* १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेत, बांदा केंद्र शाळा नंबर एक मधील, इयत्ता तिसरीत शिकणारा विद्यार्थी, कु. नील नितीन बांदेकर यांने तिहेरी यश संपादन केले. त्याने राणे इन्शुरन्स व डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग आयोजित, गीत गायन स्पर्धेत नील ने तॄतिय क्रमांक प्राप्त केला. तर सावंतवाडी, शाळा नंबर 4…

Read More

कणकवली तालुका मंडप साउंड लाईट, कॅटरर्स व जनरेटर असोसिएशनतर्फे ना. राणे यांचे स्वागत

*⚡कणकवली ता.२९-:* नारायण राणे यांची लघुउद्योग मंत्रीपदि निवड झाल्याबद्दल कणकवली तालुका मंडप साउंड लाईट, कॅटरर्स व जनरेटर असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यात आले असता त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडप डेकोरेटर्सच्या समस्या आपण दूर करू कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी त्यांच्या मागण्या…

Read More

कोकणगांधी आप्पासाहेबांच्या पुतळ्याला केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले वंदन

कळसुली पं. स. विभागाच्यावतीने वागदेत जंगी स्वागत *⚡कणकवली ता.२९-:* जनआशीर्वाद यात्रेच्या समारोपाच्या दिवशी केंद्रीयमंत्री राणे यांनी वागदे येथील गोपुरी आश्रमाला भेट दिली. गोपुरी आश्रमातील कोकणगांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत नतमस्तक होत आप्पासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर कळसुली पंचायत समिती विभागाच्या वतीने वागदेत केंद्रीयमंत्री नारायण राणेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात राणेंना पुष्पहार…

Read More

टीका करणं आता थांबवा नाहीतर मलाही प्रत्युत्तर द्यावे लागेल

ना.नारायण राणे यांचा पलटवार;अजित पवार हे अज्ञानी;संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला?;खास. संजय राऊत यांना फटकारले *⚡कणकवली ता.२९-:* “माझ्या मुलांवर टीका करण्याआधी तुझ्या मालकाची मुलं काय करतात ते पाहा. माझी मुलं सुशिक्षीत आणि हुशार आहेत. त्यांची तुलना करण्याची काहीच गरज नाही. टीका करणं आता थांबवा नाहीतर मलाही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करावी लागेल”, असा इशारा केंद्रीयमंत्री ना.नारायण…

Read More

विधानसभा उमेदवारीसाठी राणेंच्या बंगल्यावर आला तेव्हा दहशतवाद दिसला नाही का?

भाजप तालुका सरचिटणीस अमित परब यांचा केसरकर यांना सवाल *⚡सावंतवाडी ता २९-:* विधानसभा निवडणुकीवेळी जेव्हा केसरकरांना आमदारकीचे तिकीट हवे होते. त्यावेळी केसरकर हे राणे यांच्या बंगल्यावर उमेदवारी मिळवण्यासाठी रांगेत उभे होते. त्यावेळी राणेंचा दहशतवाद केसरकरांना दिसला नाही का ? असा सवाल चराठा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप तालुका सरचिटणीस अमित परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला…

Read More
You cannot copy content of this page