चतुर्थी नंतर पंधरा दिवसांत चिपी विमानतळ सुरू करणार

मंत्री नारायण राणे : बांद्यात जन आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद

*⚡बांदा दि.२९-:* चिपी विमानतळ आम्ही आज सुरू करतो, उद्या सुरू करतो असे म्हणत दोन वर्षे उलटून गेली परंतु अद्याप काही विमानतळ सुरू झाले नाही. गणेशोत्सवानंतर पंधरा दिवसांत चिपी विमानतळ वाहतुकीस सुरू करणार असल्याची ग्वाही, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. बांदा येथे जन आशीर्वाद यात्रेत मंत्री राणे बोलत होते. यावेळी आमदार प्रविण दरेकर, कालिदास कोळंबकर, रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प.अध्यक्षा संजना सावंत, महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, नगराध्यक्ष संजू परब, जि.प.सदस्य श्वेता कोरगावकर, सावंतवाडी सभापती निकिता सावंत, उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, मंडल अध्यक्ष महेश धुरी, शामकांत काणेकर, अशोक सावंत, संदिप कुडतरकर, अंकुश जाधव, मानसी धुरी, विशाल परब, ग्रा.पं. सदस्य जावेद खतीब, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, अवंती पंडीत, बाळा आकेरकर, संदिप बांदेकर, गुरुनाथ सावंत, मधुकर देसाई, प्रविण देसाई, अभिलाष देसाई आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रस्त्याची कामे नाहीत, आरोग्य व्यवस्था दयनीय असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे प्रमाण वाढले. राज्यात 1 लाख 57 हजार नागरिक कोरोनामुळे मृत्यू पावले. याला कारण म्हणजे राज्याची दयनीय आरोग्य व्यवस्था आहे. वॉर्ड बॉय नाही, नर्स नाही, डॉक्टर नाही, व्हेक्सीन नाही, औषध पुरवठा नसल्याने आरोग्य विभागाची अवस्था दयनीय झाली असल्याचे ते म्हणाले. माझ्या घरावर जे आले त्यांना मी विसरणार नाही. आलेत गेलेत याची दखल मी घेतली असून प्रत्येकाची नावे माझ्याकडे आहेत. जर तुम्ही माझ्या कुटुंबापर्यंत याल तर माझ्याने ते कदापि सहन होणार नाही. माझ्यातला नारायण राणे तुम्ही जिवंत करत असाल तर थांबा असा सूचक इशारा मंत्री राणे यांनी दिला. दरम्यान खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली.

You cannot copy content of this page