जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीयमंत्री राणेंकडून संजू परब यांचे कौतुक
*⚡दोडामार्ग ता.२९-:* जिल्ह्यात सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेस जिल्ह्यातील जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, काल रात्री सुमारे १२ च्या दरम्याने जन आशीर्वाद यात्रा सावंतवाडीत दाखल झाली होती. परंतु, रात्री एवढा उशीर होऊन देखील आमच्या संजूच्या सावंतवाडीत तुफान गर्दी जनतेने आशीर्वाद देण्यासाठी केली होती. ही गर्दी केवळ भाजप आणि माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे झाली होती. माईक बंद पडला तरी देखील सावंतवाडी येथील जनता जागची न हलता तिथे होती. हे संजुचे यश आहे अशा शब्दात सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कौतुक केले आहे.
