टीका करणं आता थांबवा नाहीतर मलाही प्रत्युत्तर द्यावे लागेल

ना.नारायण राणे यांचा पलटवार;अजित पवार हे अज्ञानी;संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला?;खास. संजय राऊत यांना फटकारले

*⚡कणकवली ता.२९-:* “माझ्या मुलांवर टीका करण्याआधी तुझ्या मालकाची मुलं काय करतात ते पाहा. माझी मुलं सुशिक्षीत आणि हुशार आहेत. त्यांची तुलना करण्याची काहीच गरज नाही. टीका करणं आता थांबवा नाहीतर मलाही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करावी लागेल”, असा इशारा केंद्रीयमंत्री ना.नारायण राणे यांनी दिला. संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांना फक्त सेनेनं बोलायला ठेवलंय. पण त्यांच्याच वक्तव्यांमुळे शिवसेना खड्ड्यात जात आहे. एवढे दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला?असा टोला खास. संजय राऊत यांना लगावतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार अज्ञानी आहेत. त्यांना केंद्रातलं काही कळत नाही.ते फक्त आपल्यामागे लागलेल्या चौकशा आणि आरोप टाळण्यात हुशार आहेत”, असं नारायण राणे म्हणाले. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीयमंत्री ना.नारायण राणे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आम.रवींद्र चव्हाण,आ.नितेश राणे,जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, आ.कालिदास कोळबकर,भाजप माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार उपस्थित होते. यावेळी बोलताना ना .राणे म्हणाले,जनआशीर्वाद यात्रेचा आजचा दहावा दिवस आहे,मुंबई ते सिंधुदुर्ग लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला,रात्री १२ व १ वाजेपर्यंत लोक स्वागतासाठी थांबले होती. शिवसेनेच्या काही लोकांनी विरोध करण्याची भाषा केली,कुठे होते? जन आशीर्वाद यात्रेत मांजर आडवं आल्याप्रमाणे आली आहेत.मी त्यांना विचारत नाही,संजय राऊत आम्हाला बोलायला लावतो,आम्हाला प्रकरणे बाहेर काढायला लावतो.संजय राऊतने बाळासाहेबांची शिवसेना संपविण्याचे काम करत असल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. संजय राऊत आणि शिवसेनेला एवढे धु धु धुतले,काय केलं..राऊत काय बोलतो,काय आहे तुझ्याकडे..केवळ शिवसेनेनेची वाट लावण्याची काम केलं जातं आहे.सामनाची चाकरी करत मालकाला खुश करण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे.माझ्या मुलांची बरोबरी करु नकोस,कोणतेही कृत्य,वाईट गोष्टी माझी मुलं करत नाहीत.राऊत यांनी हे सगळं थांबवले नाही.तर मलाही प्रहारला सुरु करावं लागेल,कोणत्या केसमध्ये कुठे कोण आहे, हे समजेल.अनिल परब मिळालाच ना..शेवटी उघड झाले आहे.अटक करण्याचेही आदेश दिले .आशीर्वाद यात्रा जाऊ देणार नाही,कुठे तरी दिसले का? गाड्याच्या मागे कुठे दिसत होते.शिवसेनेत राणेंविरोधात बोला पद मिळत.उदाहरण म्हणून इथला खासदार असल्याचा टोला विनायक राऊत यांना ना.नारायण राणे यांनी लगावला. जन आशीर्वाद यात्रा १९ ऑगस्ट पासून यात्रेला सुरुवात केली.सलग मुंबई ते सिंधुदुर्ग १० दिवस यात्रा करत आलो आहे.लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला,उशिरा जाऊनही ,लोकं रात्री १ वाजेपर्यंत थांबत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरलो,सगळे रेकॉर्ड ब्रेक यात्रा झाली असल्याचं राणेंनी सांगितले. माझ्याकडे रोजगार निर्माण करणारा हा विभाग आहे,देशाची जीडीपी वाढवणारा हा विभाग आहे.सिंधुदुर्गवाशियाना सांगतो,उद्योजक व्हा,लागणारे कर्ज,लागणारी ताकद मी देईन.व्यवसाय कोणता करावा,कसा करावा हे मार्गदर्शन केले जाईल.देशाचे आर्थिक परिवर्तन करण्यासाठी हा विभाग माझ्याकडे दिला आहे.मला देशाचे खात चांगलं बनवायचं आहे. माझ्या कडे केंद्रातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग खाते आहे.उद्योजक बनवणारा हा विभाग आहे.रोजगार निर्माण करणारा हा विभाग आहे.दरडोई उत्पन्न वाढवणारा एवढंच काय देशाच्या विकासाला साथ देणारा हा विभाग आहे.निर्यात वाढवणारा आहे.त्यामुळे या विभागाला महत्व आहे.मला साथ करायची असेल तर उद्योजक व्हा.पंतप्रधानांचे स्वप्न साकार करायचे आहे.मी माझं काम करणार आहे.सर्वच जिल्ह्यात माझे काम करायचे आहे.देशात आर्थिक क्रांती घडवायची आहे,असेही राणे म्हणाले. अजित पवार यांचे अज्ञान आहे,मी राष्ट्रवादीकडे वळलो नाही..तुमच्या कडून केसमधून कसे सुटावे हे शिकावे.उपमुख्यमंत्री व्हावे रात्री आणि सकाळी बाजूला जात केसेस काढून घ्यायचे.माझ्या खात्याला थेट अर्थमंत्र्यांकडून निधी,प्रतप्रधान निधी देताहेत.४.५ लक्ष निधी आहे.वर्षभरात निधी मिळेल.अजित पवार यांच्याकडे काय आहे.पगार नाहीत कर्मचाऱ्यांना.. शेतकऱ्यांना मदत नाही.पूरग्रस्तांना मदत नाही.त्यांनी बोलूच नये असा टोला ना.नारायण राणे यांनी अजित पवार यांना लगावला. दिल्लीत सर्व नेते माझ्या पाठीशी आहेत.योजना राबवताना जात, धर्म, पक्ष पाहणार नाही. जुने ते जुनेच..आता सोबत आहेत,हे सहकारी आहेत.सामन्याच्या लिखाणावर जाऊ नका.माझ्या घरावर हल्ला करणारे लोक आले त्यातील सरदेसाई यांच्यावरील गुन्हे काढले गेले.मला कोण कोणाला भेटला म्हणून फरक पडत नाही.माझ्या रक्तात मवाळ शब्द नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ट्रेनिंग सेंटर आणणार आहे.लोकांना मार्गदर्शन केले जाईल.उद्यो

You cannot copy content of this page