कळसुली पं. स. विभागाच्यावतीने वागदेत जंगी स्वागत
*⚡कणकवली ता.२९-:* जनआशीर्वाद यात्रेच्या समारोपाच्या दिवशी केंद्रीयमंत्री राणे यांनी वागदे येथील गोपुरी आश्रमाला भेट दिली. गोपुरी आश्रमातील कोकणगांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत नतमस्तक होत आप्पासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर कळसुली पंचायत समिती विभागाच्या वतीने वागदेत केंद्रीयमंत्री नारायण राणेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात राणेंना पुष्पहार घालून तसेच पुष्पगुच्छ देत केंद्रीयमंत्री झालेल्या आपल्या लाडक्या दादांचे कळसुली पं. स. विभागातील भाजपा कार्यकर्त्यानी जंगी स्वागत केले. यावेळी आमदार नितेश राणे, पं .स. सभापती मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, उपजिल्हाध्यक्ष राजन चिके, जि प सदस्या सायली सावंत, संदीप सावंत ऍड. समीर सावंत, समीर प्रभूगावकर, सचिन पारधिये, बंड्या मांजरेकर, बाबू राणे, अभय गावकर, गोविंद घाडीगवकर, लवू परब, शशी राणे,संतोष गावडे, गोपी लाड, भाई सावंत, प्रशांत सावंत आदी उपस्थित होते.
