भाजप तालुका सरचिटणीस अमित परब यांचा केसरकर यांना सवाल
*⚡सावंतवाडी ता २९-:* विधानसभा निवडणुकीवेळी जेव्हा केसरकरांना आमदारकीचे तिकीट हवे होते. त्यावेळी केसरकर हे राणे यांच्या बंगल्यावर उमेदवारी मिळवण्यासाठी रांगेत उभे होते. त्यावेळी राणेंचा दहशतवाद केसरकरांना दिसला नाही का ? असा सवाल चराठा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप तालुका सरचिटणीस अमित परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, केसरकर यांनी आतापर्यंत केवळ दहशतवादाच्या मुद्द्यावर आपली राजकीय पोळी भाजली आहे. परंतु ती पोळी आता करपताना दिसत असल्याने ते पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावर स्वार होण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका परब यांनी यावेळी केली. सावंतवाडी पोट निवडणुकीच्यावेळी पण केसरकर यांनी दहशतवाद या मुद्द्यावर सावंतवाडीत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु येथील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असा जोरदार टोला देखील अमित परब यांनी लगावला आहे
