माजी राज्यमंत्री आ दीपक केसरकर यांच्या वक्तव्याने राजकीय भुवया उंचावल्या
*⚡सावंतवाडी ता.२९-:* माझा राजकीय इतिहास हा रक्तरंजित नसल्याने पुन्हा एकदा संघर्ष करावा लागला तरी मी तयार आहे. त्यामुळे माझी भूमिका मी १७ तारीख नंतरच स्पष्ट करेन असा इशारा आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा उप संघटक शब्बीर मणियार आदी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी, अन्यथा त्यांच्या सोबतचा माझा राजकीय संघर्ष अटळ आहे. असा इशारा माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषद दिला आहे. कोकणच्या जनतेसाठी आपण संघर्ष सुरू केल्यानेच मला कोकणच्या जनतेने यश दिले. त्यामुळे मला मिळालेले यश हे कोकणी जनतेचे आहे. असे देखील ते म्हणाले आहेत. कोकणातील अन्यायाविरुद्ध मी केवळ एक आमदार असताना संघर्ष सुरू केला होता. आणि केवळ एक साधा आमदार असतानाच हे यश मिळवले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, आपल्या नेत्याला मंत्री पद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांना आनंद होतोच. तसेच भाजपच्या सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेला देखील आपला विरोध नाही. परंतु, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी संयम पाळणे गरजेचे आहे. असे मत देखील त्यांनी मांडले आहे.
