युवा भजनी गायिका अंकिता मेस्त्री चा मसरेत सत्कार…
*⚡मालवण ता.२८-:* मसुरे देऊळवाडा गावची युवा महिला भजनी बुवा अंकिता बाबाजी मेस्त्री हिने अगदी अल्पावधीतच भजन क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मसूरे येथे आदर्श शिक्षिका श्रीमती कल्याणी कांबळी यांच्या शुभहस्ते अंकिता मेस्त्री हिचा हृदय सत्कार करण्यात आला. अल्पावधीत महिला भजन क्षेत्रात केलेल्या गौरवास्पद कामगिरीबद्दल श्रीमती कल्याणी कांबळी यांनी तिचे विशेष कौतुक केले. मालवण तालुक्यामध्ये महिला…
