कॉंग्रेसकडून तालुक्यात राष्ट्रवादीला जोरदार धक्का…

राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

सावंतवाडी ता.२८-:जिल्हा काँग्रेसने आज राष्ट्रवादी काँग्रेसला सावंतवाडीत जोरदार धक्का दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये सामाजिक न्याय विभाग माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा दक्षता, सहनियंत्रण शासकीय कमिटी सदस्य विजय कदम, सुनील उर्फ भाई सावंत, योगेश कदम, अरुण कुडाळकर, रामचंद्र घावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादीतील या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष इर्शाद शेख, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष दादा परब, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, सच्चिदानंद बुगडे, रुपेश अहिरे आदी जिल्हा व सावंतवाडी तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page