*⚡वेंगुर्ले ता.२८-:* भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (AKAM) हि स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जात आहे.वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली आहे त्या अनुषंगाने दि २६/७/२०२१ ते २/१०/२०२१ पर्यंत स्वच्छता व पर्यावरण संवर्धन जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला.आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता व पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृती करण्यासाठी दि २/१०/२०२१ रोजी स्वच्छतेचे प्रेरणास्थान महात्मा गांधी व लाल लहादूर शास्त्री जयंती याचे औचुत्य साधून सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, हि सायकल यात्रा २/१०/२०२१ रोजी सकाळी ७ वाजता नगरपरिषद कार्यालय वेंगुर्ला येथून सुरु होऊन बॅ. खर्डेकर मार्गे हॉस्पिटल नाका, कॅम्प , राऊळवाडा, पिराचा दर्गा,जुना बस स्टँड, दाभोली नाका, बाजारपेठ मधून वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय येथे संपणार आहे. या सायकल यात्रेत शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, सायकल क्लब, कार्यालय, व नागरिक यांनी उत्स्पुर्त पणे सहभाग घ्यावा व स्वच्छतेच्या या जनजागृती मोहिमेत योगदान द्यावे असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषद तर्फे करण्यात येत आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदे मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत सायकल रॅली चे आयोजन
