मालवणात १ रोजी रक्तदान शिबिर

*⚡मालवण ता.२८-:* मालवण मधील एकता मित्रमंडळ आणि रोटरी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्वेच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन दि. १ ऑक्टोबर रोजी बाजारपेठ कासार व्हाळी, देसाई बिल्डिंग, भरड मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कोरोना विषयक शासकीय नियमांचे पालन करून संपन्न होणार आहे. या शिबिरासाठी ग्लोबल रक्तदाते या संघटनेचे सहकार्य लाभणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्ताची निर्माण झालेली कमतरता व वाढती रक्ताची मागणी लक्षात घेता रक्तदानाची गरज असून या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून जागतिक स्वेच्छिक रक्तदान दिवस साजरा करावा, अधिक माहितीसाठी अमेय देसाई 9404535273 व उमेश सांगोडकर 9421237832 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page