Headlines

दशावतारी लोकराजा सुधीर कलींगण यांचा वेतोरे येथे एम. के. गावडे यांच्या हस्ते सत्कार

*⚡वेंगुर्ले ता.२८-:* महाराष्ट्र शासन लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य दशावतारी लोकराजा सुधीर कलींगण यांचा समाजसेवक व दशावतार चाहते एम. के. गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेतोरे येथे एम. के. गावडे यांच्या निवास्थानी गणेश चतुर्थी निमित्त श्री गणरायांचे २१ दिवस पूजन सुरू असून सोमवार २७ सप्टेंबर रोजी श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होतो. त्या निमित्ताने सायंकाळी कोरोनाचे नियम पाळून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. यावेळी श्री. कलींगण यांच्या बरोबर युवा कलाकार निळकंठ सावंत यांना आर्ट बिट्स युवा कला सन्मान पुरस्कार मिळाल्या संदर्भात त्यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी दशावतार लोककला चालक मालक संस्थेचे अध्यक्ष तुषार नाईक, उपाध्यक्ष नाथा नालंग, सचिव सचिन पालव, सदस्य सागर नाईक, शरद मोचेमाडकर, सुधा दळवी, भाई शिर्के, गौरव शिर्के, वैभव तोटकेकर, नाना प्रभू, पराग प्रभू, जेष्ठ कलाकार महेश गवंडे, बाबी वेतोरकर, कलाकार दादा राणे कोनसकर, विलास तेंडोलकर आदि उपस्थिती होते.

You cannot copy content of this page